ETV Bharat / state

बारामतीमध्ये पोलिसांनाच मारहाण; १९ जणांविरोधात गुन्हा दाखल

जळोचीमधील जोशीवाडा येथे पुणे, मुंबई, कोल्हापूर येथून आलेल्या काहींच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का मारण्यात आला होता. परंतु त्यातील काही लोक सार्वजनिक ठिकाणी बिनधास्त फिरत होती. पोलिसांनी त्यांना वेगळे ठेवण्याचे ठरवले मात्र काहींनी पोलिसांवर हल्ला केला होता.

baramati police beatan
बारामतीमध्ये पोलिसांनाच मारहाण; १९ जणांविरोधात गुन्हा दाखल
author img

By

Published : Mar 28, 2020, 8:11 PM IST

बारामती (पुणे) - शहरातील जळोची येथे शुक्रवारी शहर पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणप्रकरणी १९ जणांविरोधात प्राणघातक हल्ला, कर्मचार्‍याला मारहाण, सरकारी कामकाजात अडथळा आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये दहा महिलांचा समावेश आहे. पोलीस कर्मचारी पोपट बुधा कोकाटे यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

आरोपींमध्ये समावेश नावे -

ज्ञानेश्वर बाबुराव वाकुडे, अंकुश बाबुराव वाकुडे, अक्षय हिंदूराव ढवळे, अश्विनी अशोक ढवळे, वृषाली किशोर ढवळे, वर्षा अर्जुन ढवळे, हिरकणी हिम्मत ढवळे, चांदणी अंकुश वाकुडे, मंगल बाबुराव वाकुडे, आशा मोहन गोंडे, माया दयावंत ढवळे, जया हिंदुराव ढवळे, विजय हिंदुराव ढवळे, अर्जुन हिम्मत ढवळे, किशोर हिम्मत ढवळे, चेतन अरूण साळुंखे, हिंदूराव जयराम ढवळे, हिम्मत जयराम ढवळे, साकाबाई हिम्मत ढवळे व गौरव अरूण साळुंखे (रा. जळोची, बारामती) यांचा समावेश आहे.

तक्रारीनुसार शुक्रवारी झालेल्या घटनेत शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील, सहायक पोलिस निरीक्षक आश्विनी शेंडगे, उपनिरीक्षक पद्मराज गंपले, योगेश शेलार, महिला पोलिस स्वाती काजळे, रचना काळे, पोपट कोकाटे, सिद्धेश पाटील, पोपट नाळे व होमगार्ड धायगुडे असे दहाजण जखमी झाले होते. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

काय आहे प्रकरण -

जळोचीमधील जोशीवाडा येथे पुणे, मुंबई, कोल्हापूर येथून आलेल्या काहींच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का मारण्यात आला होता. परंतु त्यातील काही लोक सार्वजनिक ठिकाणी बिनधास्त फिरत असल्याच्या कारणावरून जळोचीतील स्थानिक लोक व जोशी समाजाच्या लोकांमध्ये मारामारी सुरू होती. त्यामुळे पोलिसांनी तिकडे धाव घेतली होती. ही मारामारी सोडवून त्यातील काहींना ताब्यात घेत पोलीस सरकारी वाहनाने पोलीस ठाण्याकडे येत होते.

त्यावेळी अचानक आरोपींनी सरकारी वाहनासमोर हातात दांडके, दगड, वीटा घेवून येत वाहन थांबवत आमच्या लोकांना कोठे घेवून चालला असे म्हणत गाडी थांबवली. पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. सरकारी वाहनात बसलेले अक्षय हिंदुराव ढवळे, विजय हिंदुराव ढवळे, अर्जुन ढवळे किशोर ढवळे यांना सरकारी वाहनातून उतरवले. पुन्हा त्या सर्वांनी मिळून पोलीस अधिकारी, कर्मचार्‍याना लाकडी दांडके, दगड, विटा यांनी हल्ला केला. त्यानंतर ताब्यात घेतलेले अक्षय हिंदुराव ढवळे व इतर तेथून पळून गेले. पोलिसांनी अधिकची कुमक मागवत बळाचा वापर करुन पोलिसांवर हल्ला करणाऱया, दंगा करणार्‍यांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे अधिक तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.