पुणे : खंडणीखोर तोतया पत्रकरांने पोलिसांच्या अंगावर गाडी टाकून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून गोळीबार करत आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महेश सौदागर हनमे रा.सोलापूर याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी संतोष थोरात यांनी फिर्याद दिली होती.
खोटया बातम्या तयार: याबाबत अधिक माहिती अशी की, ऑगस्ट २०२२ पासून ते आज पर्यन्त यातील आरोपी महेश सौदागर हनमे रा. सोलापूर याने तो पत्रकार असल्याचे सांगून, फिर्यादी संतोष पोपट थोर रा. फ्लॅट नंबर १०३, बी-२ अलकॉन सोसायटी, तुळजा भवानीनगर, इ ऑन आय.टी. पार्क खराडी पुणे यांची बदनामी करण्याच्या उददेशाने वेगवेगळया खोटया बातम्या तयार करुन, त्या बातम्या व्हॉटसअॅपवर विविध लोकांना पाठवत होता.
जिवे मारण्याची धमकी दिली: फिर्यादी यांचेवर पोलीस केस करण्याची धमकी दिली. फिर्यादी यांच्या सोनिटिक्स कंपनीचे ऑफिस नंबर ४०९, टॉवर नंबर १, वर्ल्ड ट्रेड सेन्टर खराडीचे खाली असलेल्या कॅफे च्याय बाजूला पुणे येथे आला. रोख व ऑन लाईन स्वरुपात एकूण ३ लाख ८० हजार रुपये घेवून फिर्यादी यांना हॉटेल स्वराज, मोहोळ जि.सोलापूर येथे बोलावले. तेथे आणखीन ५ कोटी रुपयांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास फिर्यादी व फिर्यादी यांचे कुटुंबास जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
जीवे ठार मारण्याचा प्रयत्न: जेव्हा या खंडणीखोर पत्रकाराने फिर्यादी व्यवसायिकाला पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस टोलनाक्याच्या परिसरात बोलावले, तेव्हा पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. व्यवसायिकासोबत पोलिस असल्याची चाहूल लागताच दोघांनी पोलिसांच्या अंगावर गाडीघालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच प्रसंगावधान राखत पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांनी पिस्तूलातून दोन राऊंड गाडीच्या पाठीमागील चाकावर फायर केले. त्यानंतर मदतीसाठी आलेले पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांच्या पथकाने स्थानिकांच्या मदतीने दोघा खंडणीखोरांना पकडले. दोघेही खंडणीखोर तोतया पत्रकार असल्याचे समोर आले आहे. गाडी अंगावर घातल्याने एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे.
हेही वाचा -