ETV Bharat / state

धक्कादायक; बनावट नोटा बनवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, 32 लाखांच्या नोटा जप्त

author img

By

Published : Jul 13, 2021, 12:16 PM IST

ओटास्कीम येथील स्मशानभूमीजवळ बनावट नोटा विकणारा संशयित आरोपी येणार असल्याची खात्रीशीर माहिती निगडी पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी गोरख पवारला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे दोन हजार रुपयाच्या पन्नास नोटा आढळून आल्या. त्याची कसून चौकशी केली असता, या बनावट नोटांचे कनेक्शन गुजरातपर्यंत असल्याचे उघड झाले.

Pune
अटक करण्यात आलेल्या आरोपीसह पोलीस पथक

पुणे - बनावट नोटा तयार करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा निगडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून एकूण 32 लाख 67 हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. गोरख दत्तात्रय पवार, विठ्ठल गजानन शेवाळे, जितेंद्र रंकनिधी पाणीग्रही, राजू उर्फ रणजीत सिंह खतुबा परमार, जितेंद्रकुमार नटवरभाई पटेल, किरण कुमार कांतीलाल पटेल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

निगडीमधील ओटास्कीम परिसरात एक व्यक्ती बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती निगडी पोलिसांना खबऱ्याने दिली होती. त्यानुसार पोलीस त्या व्यक्तीच्या पाळतीवर होते. 23 जून रोजी एक व्यक्ती ग्राहक शोधण्यासाठी ओटास्कीम येथील स्मशानभूमीजवळ येणार असल्याची खात्रीशीर माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी गोरख पवारला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे दोन हजार रुपयाच्या पन्नास नोटा आढळून आल्या. तसेच त्याच्याकडे असलेल्या दुचाकीमध्ये दोन हजार रुपये दराच्या नोटांचे चार बंडल आढळून आले. पोलिसांनी सर्व नोटांचे एका बँकेकडून परीक्षण केले. त्यामध्ये आढळलेल्या सर्व नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी गोरख पवार याला अटक केली. त्याच्याकडून पाच लाख 86 हजार रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या.

असा लागला घटनेचा छडा . . .

आरोपी गोरख पवार याला या नोटा त्याचा सातारा जिल्ह्यातील मित्र विठ्ठल शेवाळेने दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीस विठ्ठल शेवाळेच्या पाटण तालुक्यातील ढेबेवाडी गावात पोहोचले. आरोपी विठ्ठल शेवाळे साखर झोपेत असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपी विठ्ठल शेवाळे याच्याकडून तीन लाख 70 हजार 500 रुपयांच्या नकली नोटा पोलिसांनी जप्त केल्या.

आरोपी विठ्ठल शेवाळे याने नकली नोटा नालासोपारा पूर्व वसई येथील जितेंद्र पाणीग्रही याच्याकडून आणल्या असल्याचे सांगितले. पोलीस थेट जितेंद्र याच्या घरी गेले असता, त्याला मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने बनावट नोटांच्या गुन्ह्यात अटक केल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एक जुलैला आरोपी जितेंद्र याला न्यायालयातून वर्ग करून घेतले.

गुजरातपर्यंत निघाले कनेक्शन . . .

जितेंद्रने त्याचा गुजरात येथील साथीदार आरोपी राजू परमार याच्याकडून बनावट नोटा आणल्याचे सांगितले. मात्र त्याच्या वास्तव्याबाबत कोणतीही माहिती नसल्याने पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याची माहिती प्राप्त केली. गुजरातमधील म्हैसाना येथे पोलिसांनी आरोपी राजूला एका लॉजवर बोलावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पोलीसांनी बनावट गिऱ्हाईक असल्याचा देखील बनाव केला. मात्र राजूने पोलिसांना संपूर्ण दिवसभर ताटकळत ठेवले.

निगडी पोलिसांनी पुन्हा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे राजूचा ठावठिकाणा शोधला. त्यावेळी तो बनासकाठा जिल्ह्यातील पालनपूर येथे असल्याचे समजले. पोलिसांनी पालनपूर येथे जाऊन आरोपी राजू परमारला अटक केली. त्याच्याकडून 15 लाख 93 हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या.

आरोपी राजू परमारने त्याच्याकडील बनावट नोटा जितेंद्रकुमार आणि किरणकुमार यांच्याकडून आणल्याचे सांगितले. पोलिसांनी जितेंद्रकुमार आणि किरणकुमार यांच्या घरून त्यांना ताब्यात घेतले. त्यांना पालनपूर येथील न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड मंजूर करून घेतली. त्यानंतर आरोपी जितेंद्रकुमार आणि किरणकुमार या दोघांकडून बनावट नोटा बनविण्यासाठी वापरलेला लॅपटॉप, कलर प्रिंटर जप्त केला.

24 जून रोजी या तपासाला निगडी पोलिसांनी सुरुवात केली. त्यानंतर सलग तब्बल 18 दिवस 11 जुलै 2021 पर्यंत निगडी पोलिसांनी पुणे, सातारा, मुंबई आणि गुजरात मधील पालनपूर येथे तपास करून दोन हजार रुपये दराच्या 1 हजार 402, पाचशे रुपये दराच्या 929 असा एकूण 32 लाख 67 हजार रुपयांच्या बनावट नोटा तसेच लॅपटॉप, कलर प्रिंटर, दुचाकी असा एकूण 33 लाख 37 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.