ETV Bharat / state

Pune Crime : खऱ्या पोलिसाकडेच बदलीसाठी पैशाची मागणी, बनावट पोलीस अधिकाऱ्याला अटक - बनावट पोलीस अधिकारी

पुण्यामध्ये बदलीसाठी पैशाची मागणी करणाऱ्या बनावट पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे. मी पोलीस निरीक्षक पाटील बोलतोय, असे म्हणून एका पोलीस कर्मचाऱ्याकडेच या माणसाने पैशाची मागणी केली होती. गुन्हे शाखा युनिटच्या एका पथकाने या बनावट पोलीस अधिकाऱ्याला अटक केली आहे. शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना तो पोलीस निरीक्षक पाटील बोलत असल्याची सांगून बदली करून देण्यासाठी पैशाची मागणी करत होता.

Pune Crime
पोलिसाकडेच बदलीसाठी पैसे मागणाऱ्या एकाला पोलिसांकडून अटक
author img

By

Published : Jan 23, 2023, 12:43 PM IST

पुणे : बदलीसाठी पैशाची मागणी करणारा एक कॉल गून्हे शाखेतील एका कर्मचाऱ्याला आल्यानंतर पथकाने सापळा रचून आयुक्तालयाच्या गेटवर बनावट माणसाला अटक केली आहे. अमित जगन्नाथ कांबळे (वय 35 रा. पुणे फिरस्ता ) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी रुस्तुम मुजावर ( वय 47 ) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मुजावर हे शहर पोलीस दलात नोकरीला आहेत. गुन्हे शाखेत कर्तव्यावर आहेत.

पैशाची मागणी : शनिवारी 5.30 सुमारास कांबळे यांनी फोन करून पोलीस निरीक्षक पाटील बोलत असल्याचे, सांगून तुमची तसेच तुमच्या ओळखीतील व्यक्तीची बदली करायची असेल, तर सांगा असे म्हटले. त्यासाठी लागणाऱ्या पैशाची मागणी करून फोन कट केला. त्याने सांगितलेले नाव आणि त्याच्या बोलण्यावरून तो बनावट असल्याचे मुजावर यांच्या लक्षात आले.

गुन्हा कबूल : परत 9.30 वाजता मुजावर यांना कांबळे यांनी परत फोन करून, मला किती वेळ थांबवता मी पोलीस आयुक्त गेट क्रमांक 3 थांबलो आहे, असे सांगितले. याबाबत मुजावर याने वरिष्ठ अधिकारी संदीप भोसले यांना याची माहिती देऊन त्याला भेटण्यासाठी पोलीस आयुक्तालाच्या गेटवर गेले. त्यावेळी कांबळे यांनी त्यांना तुम्हीच का मुजावर? असे विचारले, पोलिसांनी त्याला कोठे नेमणूक आहे ? असे विचारले असताना त्यांनी उडवाउडवी उत्तरे दिले, त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्हा कबूल केला आहे.

यापूर्वीची घटना : पुण्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मोबाईल मार्केटमध्ये कोयता गँगकडून दुकानांची तोडफोड 10 जानेवारीला करण्यात आली होती. यानंतर पुणे शहर पोलीस दलाच्या युनिट एकने कारवाई करत शहरातील कोयता टोळीला कोयता पुरवणाऱ्या कोयता विक्रेत्यावर मोठी छापेमारी केली होती. पोलीसांनी या दरम्यान तब्बल 105 कोयते जप्त केले होते. शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगच्या माध्यमातून दहशत माजविली जात होती. याआधी सिहंगड कॅम्पस येथे दहशत माजवणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर शहरातील समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील 7 ते 8 जणांकडून अशाच पद्धतीने दहशत माजवण्यात आली होती. त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली होती.

हेही वाचा : Vehicles Thieves Arrested In Mumbai : अजब चोर ! पत्नीला भेटण्यासाठी करायचे वाहन चोरी; दोघांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.