ETV Bharat / state

Ajit Pawar Statament : अजित पवारांचा पुतळा जाळल्याप्रकरणी २८ जणांना पोलिसांकडून अटक - २८ जणांविरोधात गुन्हा दाखल

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आले. तर दुसरीकडे बारामतीत अजित पवार यांचा पुतळा जाळल्याप्रकरणी २८ जणांना अटक (Police arrested 28 people) करण्यात आली आहे. अजित पवार यांनी नागपूरातील हिवाळी अधिवेशनात (winter session) छत्रपती संभाजी महारांजाबद्दल (Chhatrapati Sambhaji Maharaj) वक्तव्य केले होते. या वक्तव्याविरोधात वाद निर्माण झाला आहे.

Ajit Pawar Statament
अजित पवारांचा पुतळा जाळताना आंदोलक
author img

By

Published : Jan 2, 2023, 9:08 PM IST

बारामती (पुणे) : छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीच्या वक्तव्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्याप्रकरणी शहर पोलिसांनी २८ जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक (Police arrested 28 people) करण्यात आली. पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी ही माहिती दिली.

अजित पवारांचा पुतळा जाळून निषेध : पवार यांचे खासगी निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीसमोर त्यांच्या विरोधात निषेधाचे फलक हाती घेत कापडी पुतळा सोमवारी (२ जानेवारी) जाळण्यात आला. या आंदोलकांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. या प्रकरणी भाजप कार्यालयाजवळून मोर्चा निघणार होता. त्यामुळे पोलिसांनी तिकडे बंदोबस्त लावला असताना अचानक बाहेरून आलेल्यांनी सहयोग सोसायटीसमोर जमत आंदोलन केले. पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी कर्मचाऱयांसह तेथे जात आंदोलकांना ताब्यात घेत त्यांच्याकडील फलक व झेंडे जप्त केले.

अजित पवारांचे वक्तव्य : छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) हे धर्मवीर नव्हते, तर स्वराज्य रक्षकच होते असे अजित पवार हिवाळी अधिवेशनाच्या (winter session) शेवटच्या दिवशी म्हणाले होते. त्याचे पडसाद आता उमटत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला आहे. यावरून वेगवेगळ्या स्तरावरून वाद निर्माण केला जात आहे.

२८ जणांवर गुन्हा दाखल : या प्रकऱणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दिपक सिताराम काटे (रा. सराटी, ता. इंदापूर), मच्छिंद्र शंकर टिंगरे (रा. झारगडवाडी, ता. बारामती), अभिषेक अण्णासाहेब कोळेकर (रा. तरंगवाडी, ता .इंदापूर), अक्षय चंद्रकांत चव्हाण (रा. भिगवण रोड, बारामती), अोंकार किशोर बनकर (रा. लाटे, ता. बारामती), दादासो रामचंद्र बरकडे (रा. कटफळ, ता. बारामती), अोंकार संजय फडतरे (रा. सणसर, ता. इदापूर), अमर सुनील दळवी (रा. भवानीनगर, ता इंदापूर), अक्षय कल्याण गुलदगड (रा. पाटेगाव, ता. कर्जत, जि. नगर), रोहित गोविंद इचके (रा. कर्जत, जि. नगर), गणेश भीमराव पडळकर (रा. अकोले, ता. इंदापूर), सागर जालिंदर पवार (रा. बेलवाडी, ता. इंदापूर), स्वप्निल कैलास जोगदंड (रा. कर्जत), अौदुंबर अशोक भंडलकर व दत्ता लालासो बोडरे (रा. भादलवाडी, ता. इंदापूर), अक्षय राजेंद्र गायकवाड (रा. कर्जत, जि. नगर), आनंद सोमनाथ शेंडे (रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर), युवराज वामन माकर (रा. उंडवडी कडेपठार, ता. बारामती), सुरज बिभिषण पासगे (रा. वडापुरी, ता. इंदापूर), सागर बाळू मोरे (रा. वरकुटे खुर्द, ता. इंदापूर), अनिकेत बाळू भोंग, प्रणव रुद्राक्ष गवळी (रा.इंदापूर), संकेत संतोष काळभोर (रा. सणसर, ता. इंदापूर), अर्थव रोहित तरटे, रोहन प्रकाश शिंदे, वैभव सोमनाथ शिंदे (रा.कर्जत), किरण रवींद्र साळुंखे (रा. भवानीनगर, ता इंदापूर) व चंद्रकांत प्रल्हाद खोपडे (रा. तावशी, ता. इंदापूर) यांचा समावेश आहे. पोलिस कर्मचारी कल्याण खांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी त्यांच्याविरोधात भादंवि कलम १४३, १४९ सह मुंबई पोलिस कायद्यान्वये गुन्हा दाखल करत अटक केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे अधिक तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.