ETV Bharat / state

BJP Officer Birthday Party : भाजप पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसांच्या पार्टीत पोलीसांची दमदाटी ; कार्यकर्त्यांचा थेट पोलीस स्टेशनवर मोर्चा - BJP Officer Birthday Party

भाजपचे माथाडी शहर उपाध्यक्ष अक्षय वरघडे यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत हुल्लडबाजी चालली असताना पोलिसांनी ॲक्शन (Police action at BJP officer birthday party) घेतली. यामध्ये पोलीसांनी अनेक तरुणांना लाठीचा प्रसाद दिला. काही तरुणांचे गाड्या व मोबाईल जप्त केले. भारतीय जनता पार्टीच्या तरुणांनी या घटनेचा निषेध करत मोठ्या संख्येने मोर्चा बिबवेवाडी पोलीस स्टेशनला (party Workers march on police station) काढला.

BJP officer birthday party
भाजप पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसाची पार्टी
author img

By

Published : Dec 16, 2022, 10:28 AM IST

भाजप पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसाला पोलीसांची दमदाटी

पुणे : पुण्यातील बिबवेवाडी परिसरात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत (BJP Officer Birthday Party) हुल्लडबाजी चालली असताना पोलीसांनी थेट ॲक्शन घेतली. या घटनेचा निषेध म्हणून भाजपच्या तब्बल 100 ते 200 कार्यकर्त्यांनी रात्री 11 च्या सुमारास पोलीस स्टेशन येथे मोर्चा (Workers march on police station) काढला.

घटनेचा निषेध : बिबवेवाडी येथील भारतीय जनता पार्टीचा माथाडी शहर उपाध्यक्ष अक्षय वरघडे यांच्या वाढदिवसाची पार्टी शेतमाळा लॉन्स या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. मात्र त्या लॉन्समध्ये पोरं हुल्लडबाजी करत असल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीसांनी जाऊन थेट ॲक्शन घेतली. जमलेला जमाव पांघरवण्यासाठी प्रयत्न केला. यामध्ये अनेक तरुण जखमी झाले असून पोलीसांनी काहींच्या गाड्या, मोबाईल जप्त केले. भारतीय जनता पार्टीच्या तरुणांनी या घटनेचा निषेध करत मोठ्या संख्येने मोर्चा बिबवेवाडी पोलीस स्टेशनला (Police action at BJP officer birthday party) काढला.

पोलीस घटनास्थळी : शेतमाळा लॉन्स परिसरात वाढदिवसाला तरुणांची मोठी गर्दी जमली होती. मोठमोठ्याने स्पीकर देखील सुरू होते. त्या पार्श्वभूमीवर पोलीस कन्ट्रोलला कॉल गेला असताना स्थानिक मार्शल पोलीस घटनास्थळी पोहचले. जमाव पांघरवण्याचा प्रयत्न केला. पळापळीमध्ये धक्काबुक्की झाली आणि अनेक तरुण जखमी झाले. यामध्ये पोलीसांनी अनेक तरुणांना लाठीचा प्रसाद दिला. काही तरुणांचे गाड्या व मोबाईल जप्त (party Workers march on police station) केले.

घटनेचा अधिक तपास : याचा जाब विचारण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये मोठा मोर्चा काढला. यामध्ये कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांनी ही बिबवेवाडी पोलीस स्टेशनला भेट दिली. या घटनेचा तपास करण्यासाठी झोन पाचचे पोलीस उपआयुक्त विक्रांत देशमुख थेट बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी बिबेवाडी पोलीस निरीक्षक संगीता जाधव यांना आदेश (police station) दिलेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.