ETV Bharat / state

पुण्यात अपघातानंतर पीएमपीएमएल बसला आग, बसखाली अडकलेल्या तरुणाचा मृत्यू - Death of young man trapped under a bus

खराडी बायपास चौकाजवळ पीएमपीएमएल बस आणि दुचाकीची धडक झाली. या धडकेमुळे दुचाकीस्वार तरुण बसखाली अडकला गेला. अपघातानंतर सीएनजीवर चालणाऱ्या या बसने पेट घेतला.

बसखाली अडकलेल्या तरुणाचा मृत्यूpped under a bus
बसखाली अडकलेल्या तरुणाचा मृत्यू
author img

By

Published : Feb 22, 2021, 2:14 PM IST

पुणे - खराडी परिसरात सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास एका अपघातानंतर पीएमपीएमएल बसला भीषण आग लागली. या आगीमध्ये ही बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. मात्र बसखाली अडकलेल्या एका दुचाकीचालक तरुणाचा मृत्यू झाला. पुणे-अहमदनगर रस्त्यावरील खराडी बायपास चौकाजवळ ही घटना घडली. अजिंक्य येवले असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पुण्यात अपघातानंतर पीएमपीएमएल बसला आग
तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

सोमवारी सकाळी 10.15च्या सुमारास खराडी बायपास चौकाजवळ पीएमपीएमएल बस आणि दुचाकीची धडक झाली. या धडकेमुळे दुचाकीस्वार तरुण बसखाली अडकला गेला. अपघातानंतर सीएनजीवर चालणाऱ्या या बसने पेट घेतला. काही वेळातच संपूर्ण बसला आग लागली. बसमधील प्रवासी वेळीच खाली उतरल्याने कुणीही जखमी झाले नाही. मात्र बसच्या खाली अडकलेल्या दुचाकीस्वार तरुणाचा यात मृत्यू झाला.

वाहतूक कोंडी

बसला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवले. भर रस्त्यात बसने पेट घेतल्यामुळे या परिसरात काही काळ वाहतूक कोंडी देखील झाली होती. पेटलेली बस पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आणि इतर वाहन चालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने काही काळ वाहतुकीला अडथळाही झाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.