ETV Bharat / state

'प्लास्टिकची अंडी' ही अफवाच, 'संडे हो या मंडे बिनधास्त खा अंडे'

author img

By

Published : Jan 13, 2020, 8:49 PM IST

Updated : Jan 13, 2020, 11:11 PM IST

प्लास्टिकची अंडी असल्याच्या चर्चा समाज माध्यमांवरून अनेक दिवसांपासून येत होत्या. मात्र, हा सर्व अपप्रचार असून कुठलीच अंडी प्लास्टिकची असू शकत नाहीत, असा खुलासा 'नॅशनल एग्ज कोऑर्डीनेशन कमिटी'च्या वतीने खास डेमोच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

प्लास्टिकची अंडी
प्लास्टिकची अंडी

पुणे - बाजारात विकली जाणारी अंडी प्लास्टिकची असल्याच्या तक्रारी काही दिवसांपासून येत आहेत. मात्र, हा केवळ समाज माध्यमातून सुरू असलेला अपप्रचार असून कुठलीच अंडी प्लास्टिकची असू शकत नाहीत, असा खुलासा 'नॅशनल एग्ज कोऑर्डीनेशन कमिटी'च्या वतीने खास डेमोच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

'प्लास्टिकची अंडी' ही अफवाच

कुठल्याही पक्षाची अंडी फोडल्यास त्याच्या आत कवचाला चिटलेला एक पापुद्रा असतो. हा पापुद्रा अगदी अलगदपणे कवचापासून वेगळा करता येतो. अंडे शिळे असल्यास हाच पापुद्रा प्लास्टिक सारखा भासतो आणि ती अंडी आपल्याला प्लास्टिकची असल्याचे वाटते. मात्र, प्रत्यक्षात ते खोटं आहे, हे पटवून देण्यासाठी एक चाचणी आहे. अंड्याचा हा पापुद्रा ज्वालांवर पकडला तरी तो सहसा जळत नाही. याउलट प्लास्टिक लगेच पेट घेते. त्यामुळे प्लास्टिकची अंडी ही केवळ अफवा आहे. या अंड्यांबाबत पसरत असलेल्या गैरसमजांच्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रातील तज्ज्ञांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतचा खुलासा केला.

पुणे - 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकावरून वाद, पुण्यातील विद्यार्थ्यांनी केला निषेध

प्लास्टिक अंड्याच्या अफवांमुळे अंडी उत्पादक तसेच ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहेत. मुंबई तसेच ठाणे विभागात प्लास्टिक अंड्यांच्या नावाखाली अंडी वाहतूक करणाऱ्या गाड्या रोखल्या जात आहेत. हे सगळं थांबवण्यासाठी 'एनइसीसी'ने पुढाकार घेतला आहे. अंड्यांबाबत निर्माण झालेल्या गैरसमजातून लोक अंडी खाण्याचे टाळता आहेत. परिणामी, अंड्याची मागणीदेखील घटली. अन्न घटकांची पूर्तता तसेच व्यावसायिक दृष्टिकोनातून ही बाब बाधक आहे. त्यामुळे अंडी खाणाऱ्यांनी आता ताण न घेता बिनधास्त अंडी खावीत.

पुणे - एक एकरात 43 प्रकारची पिके.. बारामतीतील 'कृषिक' प्रदर्शनात पाहता येणार प्रात्याक्षिक

Intro:प्लास्टिकची अंडी ही अफवाच, संडे हो या मंडे बिनधास्त खा अंडे.....Body:mh_pun_01_no_plastic_eggs_its_fake_pkg_7201348

anchor
बाजारात विकली जाणारी अंडी प्लास्टिकची असल्याच्या तक्रारी काही दिवसांपासून येत आहेत. मात्र हा केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू असलेला अपप्रचार आहे. कुठलीच अंडी प्लास्टिकचे असू शकत नाहीत असा खुलासा नॅशनल एगज कॉर्डीनेशन कमिटीच्या च्या वतीने खास डेमोच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
कुठल्याही पक्षाचे अंडे फोडले की त्याच्या आत कवचाला चिकटलेला एक पापुद्रा असतो...हा पापुद्रा अगदी अलगदपणे कवचापासून वेगळा करता येतो.
अंड शिळं असल्यास हाच पापुद्रा प्लास्टिक सारखा भासतो, आणि ते अंड आपल्याला प्लास्टिक च असल्याचं वाटतं... प्रत्यक्षात ते खोटं आहे हे पटवून देण्यासाठी एक चाचणी आहे.
अंड्याचा हा पापुद्रा ज्वालांवर पकडला तरी तो सहज जळत नाही. याउलट प्लास्टिक लगेच पेट घेते. त्यामुळे प्लास्टिक अंड ही केवळ अफवा आहे. अंड्या बाबत पसरत असलेल्या गैरसमजांच्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रातील तज्ञांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतचा खुलासा केला. प्लास्टिक अंड्याच्या अफवांमुळे अंडी उत्पादक तसेच ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. मुंबई तसेच ठाणे विभागात प्लास्टिक अंड्यांच्या नावाखाली अंडी वाहतूक करणाऱ्या गाड्या रोखल्या जात आहेत. हे सगळं थांबवण्यासाठी एन इ सी सी ने पुढाकार घेतलाय. अंड्या बाबत निर्माण झालेल्या गैरसमजातून लोक अंडी खाण्याचे टाळतात. आत्ता परिणाम म्हणून अंड्याची मागणीदेखील घटते. अन्न घटकांची पूर्तता तसेच व्यावसायिक दृष्टिकोनातून ही बाब बाधक आहे. त्यामुळे अंडी खणाऱ्यानी ती बिनधास्त खावीत ...

Byte डॉ अजित रानडे, अधिष्ठाता, पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई
Byte एस एस देशमुख , सह आयुक्त, एफ डी ए
Conclusion:
Last Updated : Jan 13, 2020, 11:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.