ETV Bharat / state

पाटस टोल नाक्यावरील सिक्युरिटी गार्डकडून गावठी कट्टा, ३ जिवंत काडतुसे जप्त

author img

By

Published : Apr 17, 2021, 12:47 PM IST

पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस टोलनाक्यावरील सिक्युरिटी गार्डकडून हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. यात १ गावठी कट्टा, ३ जिवंत काडतुसे व १ तलवार आहे.

Daund
Daund

दौंड : पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस टोलनाक्यावरील सिक्युरिटी गार्डकडून हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. यात १ गावठी कट्टा, ३ जिवंत काडतुसे व १ तलवार आहे. ही कामगिरी पुणे ग्रामीण एलसीबी शाखेने केली आहे. यामुळे दौंड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याकडे हत्यारे सापडल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

संशयास्पद बुलेटवर व्यक्ती आढळून आला-

पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने फरारी आरोपीचा शोध घेत असताना एलसीबी टीमला यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाटस येथे बुलेट मोटारसायकलवर एक व्यक्ती संशयास्पदरित्या आढळून आला. धनाजी मारुती माकर (वय ४४ वर्षे ) (रा.पडवी, गायकवाड वस्ती, ता.दौंड जि.पुणे ) असे त्याचे नाव आहे.

१ गावठी पिस्टल, ३ जिवंत काडतुसे, १ तलवार जप्त -

पोलिसांनी धनाजी मारकरला ताब्यात घेतले. त्याच्याकडून बेकायदा, विनापरवाना व बेकायदेशीर बाळगलेले १ गावठी पिस्टल, ३ जिवंत काडतुसे, १ तलवार, १ बुलेट मोटारसायकल व मोबाइल जप्त करण्यात आला. या जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत १ लाख ७० हजार ४०० रुपये इतकी आहे. या आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३,४,२५ प्रमाणे कारवाई करणेसाठी, जप्त मुद्देमाल व आरोपीची वैद्यकिय तपासणी करून यवत पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

कामगिरी करणारे पथक -

ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती विभाग अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, स.पो.नि. सचिन काळे, पोलिस हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, मुकुंद कदम यांच्या पथकाने केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.