ETV Bharat / state

पिंपरीत भाजप आमदाराचा कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून सैराट डान्स, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल - Pimpri-Chinchwad latest

भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या मुलीचा विवाहसोहळा 6 जूनला आहे. काल मांडव टहाळ्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

पिंपरीत आमदारांचा डान्स
पिंपरीत आमदारांचा डान्स
author img

By

Published : May 31, 2021, 2:36 PM IST

Updated : May 31, 2021, 4:29 PM IST

पिंपरी-चिंचवड - भाजपा आमदार महेश लांडगे यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे एका व्हिडिओमधून पुढे आले आहे. भंडाऱ्यात न्हाहून निघालेले लांडगे यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर बसवून डान्स केला, सहा जून रोजी लांडगे यांच्या मुलीचा विवाह सोहळा आहे. त्यापूर्वी होणाऱ्या कार्यक्रमात कोरोना नियमांचे हरताळ फसल्याचे पुढे आले आहे. यावेळी अनेकांनी मास्क वापरला नसल्याचे देखील पाहायला मिळाले.

पिंपरीत आमदारांचा डान्स; कोरोना नियमांचे उल्लंघन

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

लांडगे यांच्या मुलीचा विवाहसोहळा 6 जूनला आहे. काल मांडव टहाळ्याचा कार्यक्रम होता. यासाठी वाजंत्री, बैलजोड्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात अनेकांनी मास्क परिधान केले नव्हते, तर सोशल डिस्टनसिंगचाही फज्जा उडवल्याचे व्हिडिओत दिसत आहे. याचे फोटो आणि व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यासंबंधी कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हेही वाचा - ....तेव्हा सरकारमधील मंत्री मोर्चे काढण्यात मग्न होते - देवेंद्र फडणवीस

Last Updated : May 31, 2021, 4:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.