पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण संख्या आटोक्यात येत असल्याचे चित्र असताना आज गुरुवारी दिवसभरात 1 हजार 12 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 24 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 266 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, आजच्या आकडेवारीमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 26 हजार 118 वर पोहचली असून पैकी, 17 हजार 673 जण कोरोनामुक्त झालेले आहेत. त्याच बरोबर शहर आणि ग्रामीण भागातील एकूण 545 जणांचा आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या महानगर पालिकेच्या रुग्णालयात 4 हजार 175 सक्रिय रुग्ण आहेत. अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
आज मृत झालेले रुग्ण विकासनगर किवळे (पुरुष ७७ वर्षे), पिंपरी (पुरुष ६३ वर्षे, पुरुष ४६ वर्षे, पुरुष ५२ वर्षे), चिंचवड (स्त्री ६२ वर्षे, पुरुष ६४ वर्षे, पुरुष ३६ वर्षे, स्त्री ६५ वर्षे), भोसरी (पुरुष ८६ वर्षे), कासारवाडी (पुरुष ७० वर्षे), थेरगाव (स्त्री ६५ वर्षे, थेरगाव ४९ वर्षे), मोशी(स्त्री ६० वर्षे, पुरुष ७४ वर्षे), काळेवाडी (स्त्री ६४ वर्षे), दापोडी (स्त्री ७० वर्षे), निगडी (पुरुष ७० वर्षे), दिघी (स्त्री ७० वर्षे), नेहरुनगर (पुरुष ७५ वर्षे), रुपीनगर (पुरुष ४५ वर्षे), च-होली (पुरुष ५९ वर्षे), नारायणगाव (पुरुष ८५ वर्षे), शिरुर (पुरुष ३६ वर्षे), येरवडा (पुरुष ७५ वर्षे), येथील रहिवासी आहेत.