पिंपरी-चिंचवड(पुणे) - पोलीस (Police) आणि दरोडेखोरांचा (Robbers) पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आमना सामना झाला. मध्यप्रदेश (Madhya Pradesh) येथील काही अट्टल दरोडेखोर हे मुंबईहून द्रुतगती मार्गाने पुण्याच्या दिशेने येत होते. याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांना (Pimpri Chinchwad Police) मिळाली. पोलिसांनी द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाका येथे सापळा रचला आणि दोन पैकी एका मोटारीतील दरोडेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आतापर्यंत एकूण 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही घटना गुरुवारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे.
- गंभीर जखमी झालेल्या त्या कर्मचाऱ्याची पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेतली भेट-
हेही वाचा - Heroin Seized Mumbai : मुंबईत 2 कोटी 7 लाख किमतीचा हेरॉईन ड्रग्सचा साठा जप्त, दोघांना अटक
दरोडेखोरांनी अंगावर गाडी घालून एका पोलीस कर्मचाऱ्याला गंभीर जखमी केले आहे. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. मध्यप्रदेश येथील काही दरोडेखोर मुंबईहून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाने येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, उर्से टोल नाका येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेत असताना एका गाडीसह आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, गुंडा स्कॉडचे पोलीस कर्मचारी शुभम तानाजी कदम यांच्या अंगावर गाडी घातली यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन कदम यांची विचारपूस केली आहे. डोंगराळ परिसरात पळून गेलेल्या आरोपींचा मध्यरात्रीपर्यंत शोध सुरू होता. आतापर्यंत नऊ दरोडेखोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून आणखी काही दरोडेखोर हे डोंगराळ परिसरात लपून बसले असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - Pune Accident : दुचाकीस अज्ञात वाहनाची धडक; युवतीचा जागीच मृत्यू