ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना बाधितांचा आकडा 80 हजारांच्या पार - pimpri chinchwad covid cases

पिंपरी-चिंचवड शहरातील बाधितांनी 80 हजारांचा आकडा ओलांडला असून शहरातील बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे शहरातील 68 हजार बाधितांनी कोरोनावर मात केली आहे

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Oct 4, 2020, 10:22 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 80 हजारच्या पुढे गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्यापैकी, 68 हजार 453 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरातील बाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. मृत्यूचा दर आटोक्यात आणण्यात महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाला यश येत नसल्याचे चित्र आहे. नागरिकांनी बेजबाबदारपणाने वागणे योग्य नाही, राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन नागरिकांनी करायला हवे. एवढेच नाही तर सोशल डिस्टसिंग आणि मास्क वापरणे अत्यंत महत्वाचे आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील बाधितांनी 80 हजारांचा आकडा ओलांडला असून शहरातील बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे शहरातील 68 हजार बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. महानगर पालिकेकडून शहरातील प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवली जात असून दररोज त्याद्वारे नागरिकांची तपासणी केली जात आहे. कोरोनामुळे शहरातील 1 हजार 361 जणांना प्राण गमवावे लागले असून महानगर पालिकेच्या हद्दी बाहेरील 518 जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या महानगर पालिकेच्या रुग्णालयात 3 हजार 434 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण संख्या असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान, शहरात आज दिवसभरात 544 जण कोरोना बाधित आढळले असून 20 जनांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, 691 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात अनलॉक 5 ची घोषणा झाली असून नागरिकांनी अधिक सतर्कतेने आणि जबाबदारी ने वागणे त्याचबरोबर नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे. तरच, कोरोना महामारी आटोक्यात येईल अन्यथा याचे पडसाद येणाऱ्या काळात नक्कीच उमटतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.