ETV Bharat / state

Simba and James in Police Force: गुन्हेगारांनो सावधान! पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात आता 'सिम्बा आणि जेम्स' उलगडणार गुन्हे - Simba and James

Simba and James in Police Force : अनेकदा पोलिसांना गुन्ह्यांचा तपास करताना श्वानांची मदत घ्यावी लागते. पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात आता 'सिम्बा आणि जेम्स' हे दोन ट्रेनिंग घेतलेले श्वान दाखल झाले आहेत. ते आता पोलिसांना तपासासाठी मदत करणार आहेत.

Pimpri Chinchwad City Police Force
पिंपरी चिंचवड शहर पोलीस दल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2023, 10:19 PM IST

पिंपरी चिंचवड Simba and James in Police Force: औद्योगिक नगरी म्हणून ओळख असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराचा दिवसेंदिवस व्याप वाढत आहे. त्याचबरोबर शहरातील वाढणाऱ्या गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्याकरिता पोलीस देखील आपल्या परीनं गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालय अंतर्गत नुकत्याच दोन नवीन अधिकाऱ्यांचा पोलीस दलामध्ये समावेश झालाय. मात्र हे पोलीस अधिकारी कुणी व्यक्ती नसून दोन ट्रेनिंग घेतलेले श्वान आहेत. (dogs in police force)

दोन श्वान अधिकारी : 'सिम्बा' आणि 'जेम्स' अशी या दोन नवीन अधिकाऱ्यांची नावं आहेत. पोलीस आयुक्तालयाला सुरु होऊन पाच वर्ष उलटल्यानंतर अखेर या नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक शहर पोलीस दलात झालीय. औद्योगिक नोकरी आणि आयटी हब असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या जवळपास 30 लाखांपेक्षा जास्त आहे. पूर्वी पिंपरी चिंचवड हा भाग पुणे पोलीस आयुक्तालया अंतर्गत येत होत. मात्र पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झालीय. 15 ऑगस्ट 2018 रोजी ते कार्यान्वित देखील झाले. त्यानंतर पोलीस आयुक्तालयाला पाच वर्ष उलटून गेली तरी देखील आयुक्तालय अद्याप अनेक बाबींसाठी धडपडत आहे. मुख्यालयाची संख्या कमी, वाहनांची संख्या कमी, पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी यासारख्या अनेक समस्यांवर वरिष्ठ मंडळी यासाठी पाठपुरावा करत आहे. एका पाठपुराव्याला नुकतंच यश आलंय. श्वान पथकाच्या निमित्तानं दोन श्वान अधिकारी पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात दाखल झाले आहेत. (dogs will now solve crimes)

श्वान पथक : सैन्यात आणि पोलीस विभागात या पथकांना फार महत्त्व असतं. बॉम्बशोधक पथकात हे श्वान पथक अनेक जीव वाचवण्यात मोलाचा वाटा उचलतं. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस दलात आता पोलीस कर्मचाऱ्यांसह हे श्वान देखील गुन्ह्याचा तपास आणि चौकशी करण्यात मदत करणार आहे. 'सिम्बा' हा श्वान गुन्ह्यांशी निगडीत काम करणार आहे. चोरी, घरफोडी, खून यांसारख्या गुन्ह्यांच्या घटनास्थळी जाऊन आरोपींचा माग काढणं, हे त्याचं मुख्य काम असणार आहे. गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांना मदत करण्यासाठी सिम्बा कटिबद्ध आहे. त्याच्यासोबत त्याचे दोन हॅँडलर आहेत. प्रत्येक हॅँडलर सिम्बाची 12-12 तास काळजी घेणार आहेत. शिस्तीचे पालन, सुचनांचं पालन, वासाचे प्रशिक्षण, माग काढणं हे प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षणानुसारच त्यांचं स्पेशलायझेशन ठरतं. (Simba and James in Police Force)

हॅँडलर सावलीप्रमाणे सोबत : 'जेम्स' हा श्वान बॉम्ब शोधक नाशक पथकात (बीडीडीएस) काम करणार आहे. त्याच्या सोबत देखील दोन हॅँडलर आहेत. सिम्बाप्रमाणेच प्रत्येक हॅँडलर त्याची 12-12 तास काळजी घेईल. त्यांचे डाएट, व्यायाम, प्रशिक्षण, औषधे अशा प्रत्येक गोष्टीची काळजी हे हॅँडलर घेणार आहेत. पोलीस दलात असणाऱ्या श्वानांना सुरुवातीपासून जो हॅँडलर सांभाळतो, त्याचंच ते ऐकतात. त्यामुळे हे श्वान जिथे जातात, तिथे त्यांचे हॅँडलर सावलीप्रमाणे सोबत असतात.

श्वान पथकाची मदत : पिंपरी-चिंचवड पोलिसांना अनेक गुन्ह्यात पुणे शहर पोलिसांच्या श्वान पथकाची मदत घ्यावी लागत होती. त्यामुळे अनेक तांत्रिक अडचणीदेखील अनेकदा निर्माण झाल्या होत्या. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात नवीन दोन श्वान दाखल झाल्यानं अनेक गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांना मोठी मदत होणार आहे.

हेही वाचा :

  1. Crime In Satara : १७ वर्ष मुलाचा अज्ञाताकडून खून, फॉरेन्सिक टीमचा श्वान पथकाकडून तपास सुरू
  2. Puppy Injured : वर्गणी गोळा करून पोलिसांनी वाचवले श्वानाचे प्राण
  3. Belgium Malinois Dog Nashik : सर्वात तरबेज बेल्जियम मेलिनोइस श्वान नाशिक पोलिसांच्या ताफ्यात दाखल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.