पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात सर्व पक्षांकडून आगामी विधानसभेची जय्यत तयारी केली जात आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी शड्डू ठोकले आहेत.
तालुका हवेली हा मतदारसंघ होता. पिंपरी-चिंचवड शहराचा या मतदारसंघात समावेश होता. २००९ साली हवेली मतदारसंघाची पुनर्रचना झाली. शहरात तीन मतदारसंघ स्थापन झाले होते. यात पिंपरी, चिंचवड आणि भोसरीचा समावेश आहे. पिंपरी आणि चिंचवड हा मतदारसंघ मावळ लोकसभेत समाविष्ट करण्यात आला तर भोसरी हा शिरूर लोकसभेत समाविष्ट करण्यात आला आहे.
हेही वाचा - दिवाळीपूर्वीच निवडणुका; २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ला मतमोजणी
२००९ साली मतदारसंघ झाल्यानंतर भोसरीमधून पहिल्यांदा राष्ट्रवादीचे विलास लांडे, पिंपरीमधून राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे तर चिंचवडमधून अपक्ष लक्ष्मण जगताप हे पहिल्यांदा आमदार झाले होते. पिंपरी हा राखीव मतदारसंघ होता. त्यानंतर २०१४ ला दुसरी विधानसभा निवडणूक झाली. यात राष्ट्रवादीचे विलास लांडे पराभूत झाले, तर महेश लांडगे विजयी झाले. पिंपरीमध्ये राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे पराभूत झाले. तेथे शिवसेनेने झेंडा फडकवत आमदार गौतम चाबुकस्वार विजयी झाले. चिंचवडमधून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे निवडून आले. त्यावेळी सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. युती किंवा आघाडी झाली नव्हती.
या विधानसभा निवडणुकीत काँग्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी ठरलेली आहे. त्यानुसार त्यांची जागावाटप झालेली आहे. अद्याप भाजप शिवसेनेचा युतीचा निर्णय झालेला नाही. युतीच्या निर्णयावर बरचसे चित्र अवलंबून आहे. त्यावरच लढतीचे स्वरूप ठरणार आहे. शिवसेना आणि भाजपचा पिंपरी-चिंचवड-भोसरी या तिन्ही मतदारसंघावर प्रचंड प्रभाव आहे. २०१९ च्या लोकसभेत तशा प्रकारचे मतदान झालेले आहे.
हेही वाचा -विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा राज ठाकरेंना कार्टूनमधून चिमटा!
लोकसभेला महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतदान झालेले आहे. पिंपरी आणि चिंचवडमध्ये युतीचे श्रीरंग बारणे यांना अधिक मताधिक्य मिळाले होते. तर भोसरीमधून शिवसेनेचे पराभूत उमेदवार आढळराव पाटील यांना ४१ हजारांचे मताधिक्य होता. विधानसभेला सर्वच पक्ष स्वतंत्र लढले. तर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होणार. युती झाल्यास युती विरुद्ध महाआघाडी अशी थेट लढत होणार.
विधानसभेला सर्वच पक्षाकडून इच्छुकांची गर्दी
भोसरी विधानसभा मतदारसंघ
भारतीय जनता पार्टी इच्छुक
- महेश लांडगे (विद्यमान आमदार)
- एकनाथ पवार
- रवी लांडगे
शिवसेना इच्छुक
- सुलभ उबाळे
- धनंजय आल्हाट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इच्छुक
- विलास लांडे
- दत्ता साने
पिंपरी विधानसभा मतदारसंघ
भारतीय जनता पक्ष इच्छुक
- अण्णा पिल्ले
- वेणू साबळे
- भीमा बोबडे
- अमित गोरखे
- तेजस्विनी कदम
आर.पी.आय (आठवले गट)
- चंद्रकांता सोनकांबळे
शिवसेना इच्छुक
- गौतम चाबुकस्वार
- जितेंद्र ननावरे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इच्छुक
- अण्णा बनसोडे
- राजू बनसोडे
- सुलक्षणा धर
- शेखर ओव्हाळ
चिंचवड विधानसभा मतदारसंघ
भारतीय जनता पक्ष
- आमदार लक्ष्मण जगताप हेच उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इच्छुक
- भाऊसाहेब भोईर
- नाना काटे
- प्रशांत शितोळे
- मयूर कलाट
- मोरेश्वर भोंडवे
शिवसेना भाजप युती न झाल्यास
- राहुल कलाटे
- गजानन चिंचवडे