पिंपरी-चिंचवड (पुणे) - पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून 10 दिवसांसाठी कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सकाळपासूनच शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून नियमांची पायमल्ली करणाऱ्या 434 नागरिकांवर 188 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडकरांनी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे आज पासून दहा दिवसाचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील 69 नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. संचारबंदी लागू असल्याने शहरात बहुतांश परिसर, चौक हे निर्मनुष्य दिसत होते. अगदी मुख्य रस्ते देखील सामसूम असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, नियमांची पायमल्ली करणाऱ्या 434 जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून सक्त ताकीद दिली आहे.
सकाळ पासून शहरातील परिस्थिती अत्यंत शांततामय होती. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे दिसल्यानंतर पोलिसांनी आदेशाचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली होती. त्यात, 434 जणांवर 188 नुसार कारवाई करण्यात आली असून हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लॉकडाऊनमध्ये नियमांची पायमल्ली करणाऱ्या 434 जणांवर गुन्हे दाखल - पिंपरी -चिंचवड कोरोना गुन्हे बातमी
पिंपरी-चिंचवड शहरात वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे आज पासून दहा दिवसाचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील 69 नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. संचारबंदी लागू असल्याने शहरात बहुतांश परिसर, चौक हे निर्मनुष्य दिसत होते. अगदी मुख्य रस्ते देखील सामसूम असल्याचे पाहायला मिळाले.