ETV Bharat / state

दोन्ही पायांनी दिव्यांग तरीही दुकान फोडले!

30 नोव्हेंबरच्या रात्री रास्ता पेठेतील 'न्यु हॅलो मोबाईल शॉपी' या दुकानाचे शटर तोडून रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण दीड लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता चोरटा हा दिव्यांग असल्याचे दिसून आले.

दोन्ही पायांनी दिव्यांग चोर
दोन्ही पायांनी दिव्यांग चोर
author img

By

Published : Dec 8, 2019, 3:00 PM IST

पुणे - दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या तरूणाने पुण्यात मोबाईलचे दुकानातून दीड लाखांची चोरी केली. विजयभाई जिलिया (वय 20) असे या तरूणाचे नाव आहे. पुणे पोलिसांनी त्याचा माग काढत गुजरातमध्ये जाऊन बेड्या ठोकल्या.

दोन्ही पायांनी दिव्यांग चोर

30 नोव्हेंबरच्या रात्री रास्ता पेठेतील 'न्यु हॅलो मोबाईल शॉपी' या दुकानाचे शटर तोडून रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण दीड लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता चोरटा हा दिव्यांग असल्याचे दिसून आले. पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील सीसीटीव्ही तपासून आरोपीचा माग काढला. तो पुणे स्टेशनच्या दिशेने गेल्याचे व तेथून पुढे मुंबईला गेल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी मुंबईला जाऊन आरोपीचा शोध घेतला. तो गुजरातला जाणाऱ्या रेल्वेत बसून निघून गेल्याचे निदर्शनास आले.

पुणे पोलिसांचे एक पथक सीसीटीव्ही चित्रीकरण आणि अन्य पुराव्यांच्या आधारे गुजरातमधील नवसारी येथे पोहचले. त्यानंतर तेथील एका दुर्गम भागातून त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल असा ऐवज जप्त करण्यात आला.

Intro:दोन्ही पायांनी अपंग, हिऱ्याला पैलू पाडण्यात तरबेज, तरीही दुकान फोडले; गुजरातला जाऊन पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दोन्ही पायांनी अपंग असल्यामुळे त्याला चालताही येत नाही..हिऱ्याला पैलू पाडण्याच्या कामात तरबेज..गुजरातमधील एका हिरा व्यापाऱ्याकडे काही दिवस कामही केले..पण एके दिवशी तो पुण्यात आला आणि दुकान फोडून दीड लाखाची चोरी केली..मात्र पुणे पोलिसांनी त्याचा माग काढत गुजरातमध्ये जाऊन बेड्या ठोकल्या..विजयभाई जिलिया (वय 20) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. समर्थ पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 नोव्हेंबरच्या रात्री रास्ता पेठेतील "न्यु हॅलो मोबाईल शॉपी' या दुकानाचे शटर उचकटून रोख रक्कम व मोबाईल असा दिड लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता चोरटा हा अपंग असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील सीसीटीव्ही तपासून आरोपीचा माग काढला असता तो पुणे स्टेशनच्या दिशेने गेल्याचे व तेथून पुढे मुंबईला गेल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी मुंबई येथे जाऊन तेथूनही आरोपीचा शोध घेतला. त्यावेळी तो रेल्वेने गुजरातला जाणाऱ्या रेल्वेत बसून
निघून गेल्याचे निदर्शनास आले.

त्यानुसार पुणे पोलिसांचे एक पथक सीसीटीव्ही चित्रीकरण व अन्य पुराव्यांच्या आधारे गुजरातमधील नवसारी येथे पोचले. त्यानंतर तेथील दुर्गम भागातील एका ओढ्याच्या काठावर उभारलेल्या झोपडीमध्ये राहात असल्याचे पोलिसांनी पाहीले. तेथून त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून रोख रक्कम व मोबाईल असा सव्वा लाखाचा ऐवज जप्त केला.Body:।।Conclusion:।।।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.