ETV Bharat / state

औरंगाबादची पुनरावृत्ती पुण्यात टळली, अवघ्या 100 मीटरवर येऊन थांबली रेल्वे; लोको पायलटच्या समयसूचकतेने वाचले मजूर

उरुळी आणि लोणी रेल्वे स्टेशन दरम्यान काही लोक रेल्वे रुळवरुन चालत होते. यामध्ये काही लोक आरामात रुळावर सामान घेऊन बसले होते. तर काही जण साहित्य घेऊन चालत होते. दरम्यान त्याचवेळी उरुळीवरून पुण्याला मालगाडी येत होती. तेव्हा मालगाडीच्या लोको पायलटच्या नजरेत ही लोकं आली. त्यावेळी पायलटने हॉर्न वाजवून गाडीचे इमर्जन्सी ब्रेक लावून गाडी थांबवली.

Pune
100 मीटर अंतरावर येऊन थांबली रेल्वे
author img

By

Published : May 9, 2020, 5:16 PM IST

पुणे - लॉकडाऊनमुळे सर्व वाहने, रेल्वे बंद असल्याने हवालदिल झालेले लोक कधी रस्त्यावरून तर कधी रेल्वे ट्रॅक पकडून पायपीट करत गावाकडे निघाले आहेत. मात्र, रेल्वे रुळावरुन चालणं जीवावर बेतणारे आहे, हे औरंगाबादजवळील करमाड रेल्वे दुर्घटनेतून समोर आले आहे. मात्र, तरीही लोक जीवची पर्वा न करत रेल्वे रुळावरुन चालत आपले गाव जवळ करत आहेत. आज पुणे जंक्शनजवळील उरुळी आणि लोणी रेल्वे स्टेशन दरम्यान काही लोक रेल्वे रुळावर चालत होते. त्यावेळी रेल्वे आल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र, लोको पायलटने वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

याबाबात अधिक माहिती अशी की, शुक्रवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुणे जंक्शनजवळील उरुळी आणि लोणी रेल्वे स्टेशन दरम्यान काही लोक रेल्वे रुळवारुन चालत होते. यामध्ये काही लोक आरामात रुळावर सामान घेऊन बसले होते. तर काही जण साहित्य घेऊन चालत होते. दरम्यान त्याचवेळी उरुळीवरून पुण्याला मालगाडी येत होती. तेव्हा मालगाडीच्या लोको पायलटच्या नजरेत ही लोकं आली. त्यावेळी पायलटने हॉर्न वाजवून गाडीचे इमर्जन्सी ब्रेक लावून गाडी थांबवली. मालगाडी या लोकांपासून फक्त 100 मीटर दूरवर येऊन थांबली. त्यामुळे येथील जवळपास 20 लोक गाडीखाली येण्यापासून वाचले आणि मोठी दुर्घटना टळली.

पुण्यात मोठी दुर्घटना टळली
पुण्यातून रेल्वे रुळांवरुन चालत जाणारे मजूर

घटनेची माहिती तत्काळ नियंत्रण कार्यालयास कळवण्यात आली. त्यानंतर लोकांना रेल्वे ट्रॅकपासून दूर हटवण्यात आले. तसेच त्यांना रेल्वेमार्गाचा अशाप्रकारे चालण्यासाठी उपयोग करू नका, हेही समजावण्यात आले. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने नागरिकांना रेल्वे ट्रॅकचा वापर करू नका, त्यावरून चालत प्रवास करू नका, असे आवाहन केले आहे.

सध्या रेल्वे बंद आहेत, अशी समजूत करून घेऊ नका. उलट लॉकडाऊनच्या काळामध्ये मालगाड्या, पार्सल गाड्या मोठ्या प्रमाणात चालवल्या जात आहेत. तसेच काही श्रमिक स्पेशल गाड्या देखील चालवल्या जात आहेत. म्हणून रेल्वेच्या सर्व लाईनवर गाड्यांचे येणे जाणे सतत चालू आहे. त्यामुळे नागरिकांनी असा धोका पत्करू नये, असेही रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.