पुणे (पिंपरी चिंचवड) PCMC Crime News : रागाच्या भरात दिनेश दशरथ कांबळे हा घर सोडून मित्रांकडे गेला. मित्रांसोबत दारू पिताना मित्राच्याच बायकोबद्दल अश्लील कमेंट केली. त्यामुळे दोन मित्रांनी मिळून तिसऱ्या मित्राचा खून केलाय. ही खळबजनक घटना वाकड परिसरातील थेरगाव येथे घडली होती. या प्रकरणी सिद्धांत रतन पाचपिंडे (वय 23, रा. गुरुनानक नगर कॉलनी, रहाटणी), प्रतिक रमेश सरवदे ( वय 25, रा. कुदळवाडी, चिखली) या दोघांना पोलिसांनी अटक केलीय.
बेपत्ता असल्याची तक्रार : दिनेश हा कोणताही कामधंदा करत नव्हता. यापूर्वीदेखील तो बरेच दिवस घराबाहेर राहत असे. परंतु, यावेळी सहा महिन्यानंतर मुलगा घरी परतला नाही, म्हणून दिनेशच्या आईनं पोलिसांकडे मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत हा गुन्हा उघडकीस आणलाय. मित्राचा खून करणाऱ्यांना वाकड पोलिसांनी अटक केलीय. सहा महिन्यानंतर पोलिसांनी या घटनेचा उलगडा केलाय. (Murder news)
घर सोडून गेला : पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांपूर्वी दिनेश हा घरातून वडिलांची सोनसाखळी घेऊन गेला होता. त्यामुळं त्याची आई रागावली होती. याचा राग मनात धरून दिनेश घर सोडून गेला. यापूर्वीदेखील दिनेश बऱ्याच वेळेस घर सोडून दहा ते पंधरा दिवस मित्रांच्या घरी राहिला होता. त्यामुळे यावेळेसही दिनेश मित्रांच्याच घरी गेला असेल. दोन-तीन दिवसांनी परत येईल, असं घरच्यांना वाटत होतं. मात्र सहा महिने उलटल्यानंतरही दिनेश घरी आला नाही, तेव्हा घरच्यांनी दिनेश बेपत्ता असल्याची वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वाकड पोलिसांनी घटनेचा तपास करत त्याच्या मित्रांची चौकशी केली, तेव्हा हा गुन्हा उघडकीस आलाय. (talking obscenely about friends wife)
काय घडलं नेमकं? दिनेश घर सोडून निघाल्यानंतर 15 मार्च रोजी त्याच्या दोन मित्रांसोबत दारू पित बसला होता. प्रतीक आणि सिद्धांत यांच्यासोबत दारू पीत असताना दिनेशनं प्रतीक सरवदे याच्या पत्नीबाबत अश्लील कमेंट केली. त्यामुळे त्या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर वादाचं भांडणात रुपांतर झालं. बघता बघता दोघांनी दिनेशला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर प्रतीक व सिद्धांतनं मिळून दिनेशच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारत त्याला जखमी केलं. त्यानंतर ते तेथून निघून गेले. दिनेश हा निर्जनस्थळी एकटाच जखमी अवस्थेत पडलेला होता. त्यानंतर पुन्हा मध्यरात्री (16 मार्च) अडीच वाजता प्रतीक आणि सिद्धांत यांनी जखमी दिनेशला गाडीवर बसवलं. त्याला नाशिक फाटा येथील पुलावरून खाली फेकून दिलं. यामध्ये दिनेशचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी रस्त्यावर पडलेल्या दिनेशचा अपघाती मृत्यू झाल्याची भोसरी पोलीस ठाण्यात नोंद केली होती.
पोलीस पथक : ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेशजवादवाड, पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहायक फौजदार बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार वंदू गिरे, संदीप गवारी, स्वप्नील खेतले, दीपक साबळे, अतिश जाधव, प्रमोद कदम, प्रशांत गिलबिले, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, राम तळपे, अजय फल्ले, भास्कर भारती, स्वप्नील लोखंडे, सौदागरलामतुरे, कौंतेय खराडे, रमेश खेडकर, सागर पंडीत यांनी केलीय.
हेही वाचा :