पिंपरी-चिंचवड- देहूरोड येथील कोविड सेंटरची दुर्दशा झाल्याचे पाहायला मिळाले असून रुग्णांना हव्या असलेल्या आवश्यक सुविधा मिळत नसल्याचा आरोप कोरोनाबाधित रुग्णांनी केला आहे. दरम्यान, मुंबई (पनवेल) मध्ये नुकतेच कोविड सेंटरमध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची गंभीर घटना घडली होती. मात्र, देहूरोड येथील कोविड सेंटरमध्ये महिला आणि पुरुष एकत्रितच उपचार घेत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सेंटरच्या अधीक्षक सुनीता जोशी यांनी रुग्णांनीच कुटुंबासोबत राहण्याचा आग्रह केल्याचे म्हणत आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.
देहूरोडमधील कोविड सेंटरची दुर्दशा... रुग्ण दोन-तीन दिवस विनाअंघोळीचे - Dehuroad Covid Center pune
पिंपरी-चिंचवड शहरालगत असलेल्या देहूरोड परिसरात 140 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी बरेच रुग्ण येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. मात्र, याठिकाणी रुग्णांना आवश्यक असलेल्या सुविधा मिळत नसून सेंटरची दुर्दशा झाल्याचे पाहायला मिळत आहे. रुग्णांनी देखील विविध सुविधा मिळत नसल्याचा आरोप केला आहे.