पुणे - गेल्या अनेक दिवसांपासून शिरूर तालुक्यातील जांबुत परिसरामध्ये एका नरभक्षी बिबट्याने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. त्यामुळे या बिबट्याला पकडण्याचे मोठे आव्हान वनविभागापुढे होते, अखेर आज पहाटे या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून वनविभागाचे कर्मचारी दिवस-रात्र या परिसरात आठ पिंजरे लावून गस्त घालत होते.अखेर आज पहाटे या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. बिबट्याला पकडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. हा बिबट्या अंदाजे दहा ते बारा वर्षे वयाचा असून नर जातीचा आहे.