ETV Bharat / state

पुणे-नाशिक महामार्गावर, दरीत पडलेल्या तरुणाला वाचविण्यात प्रवाशांना यश... - पुणे-

पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटात एका चारचाकीने दुचाकीला धडक दिली. या धडकेमुळे एक दुचाकीस्वार युवक दुचाकीसह खोल दरीत पडला. या युवकाच्या मदतीला रस्त्याने प्रवास करणारे प्रवासी एकत्र आले आणि दोराच्या साहाय्याने या युवक आणि दुचाकीला दरीतुन बाहेर काढण्यात आले.

पुणे-नाशिक महामार्गावर दरीत पडलेल्या तरुणाला वाचविण्यात प्रवाशांना यश.
author img

By

Published : Jul 20, 2019, 8:39 AM IST

पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असते, यापैकी अनेक अपघाताग्रस्तांना मदत न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागतो. शुक्रवारी सायंकाळी मात्र या महामार्गावर याला अपवाद ठरेल, असे दृष्य पाहायला मिळाले. पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटात एका चारचाकीने दुचाकीला धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीस्वार तरुण दुचाकीसह खोल दरीत पडला. या तरुणाच्या मदतीला रस्त्याने प्रवास करणारे प्रवासी एकत्र आले आणि दोराच्या साहाय्याने त्याला आणि दुचाकीला दरीतून बाहेर काढले. योगेश किसन घोमाल (रा.अकोले, जिल्हा अहमदनगर )असे या तरुणाचे नाव आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर दरीत पडलेल्या तरुणाला वाचविण्यात प्रवाशांना यश...
शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास योगेश घोमाल हा दुचाकीवरुन खेड घाटातून जात होता. यावेळी पाठीमागून आलेल्या एका चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे योगेश दुचाकीसह घाटातील खोल दरीत पडला. घटना स्थळाजवळ उपस्थित खेड येथील वकील नवनाथ बाळ सराफ आणि पत्रकार अय्यूब शेख यांच्या ही बाब लक्षात येताच, त्यांनी ताबडतोब खाली उतरून दोराच्या साहाय्याने आधी योगेशला आणि नंतर दुचाकीला दरीतून बाहेर काढले. यावेळी निगडीहून माळीणला वृक्षारोपण करण्यासाठी आलेले गो-ग्रीन संस्थेचे प्रशांत भालेकर, मयूर चव्हाण, नरेंद्र शिंदे, शफी हैदर सय्यद, समीर एरंडे, सौरभ कवडे यांनी देखील योगेशला बाहेर काढण्यासाठी मदत केली. विशेष म्हणजे या बचावकार्यादरम्यान घाटात कोणत्याही प्रकारची रहदारी न होऊ देता ही मदत मोहीम राबवण्यात आली.

Intro:Anc_पुणे-नाशिक महामार्गावर अपघातांची मालिकाच सुरु असते अनेकांना तर मदतच मिळत नाही मात्र आज माणसातील माणुसकी दर्शन घडलं आहे पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटात एका कारने दुचाकीला धडक दिल्याने एक तरुण दुचाकीसह खोल दरी गेला त्याला मदतीची गरज होती अशाच याच रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवासी तरुणांनी एकत्र येत रस्सीच्या साहायाने या तरुणाला दरीच्या बाहेर काढून जीवदान दिले आहे.यालाच म्हणतात "देव तारी त्याला कोन मारी"
योगेश किसन घोमाल (राहणार अकोले, जिल्हा अहमदनगर )असे अपघातातील तरुणाचे नाव..

आज सायंकाळच्या सुमारास योगेश घोमाल हा तरुण आपल्या दुचाकीवरुन खेड घाटातुन जात असताना पाठीमागुन आलेल्या कारने जोरदार धडक दिल्याने योगेश घाटातील खोल दरीत गेला घटनासास्थळी उपस्थित असलेले खेडचे वकील नवनाथ बाळ सराफ, पत्रकार अय्युब शेख यांनी ताबडतोब खाली उतरून दोर लावून या युवकास वर काढले व त्याची दुचाकी सुद्धा वर काढून चालू करून दिली....

यावेळी निगडीहून माळीण ला वृक्षारोपण कारण्यासाठी गो ग्रीन संस्थेचे प्रशांत भालेकर ,मयूर चव्हाण ,नरेंद्र शिंदे ,शफी हैदर सय्यद ,समीर एरंडे सौरभ कवडे यांनी देखील मदत केली.आणि विशेष म्हणजे घाटात ट्राफिक न होऊ देता सदर मदत मोहिम राबवण्यात आली.यातुनच माणसातील माणुसकी आजही कायम असुन प्रत्येकाने या तरुणांच्या कार्यचा आदर्श घेण्याची गरज आहे.Body:..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.