राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या शतकपूर्ती निमित्त पंडित घोष यांच्या बासऱ्यांचा संग्रह प्रदान - राजा दिनकर केळकर
पुण्यातील राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या वस्तू संग्रहाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याने प्रख्यात बासरी वादक दिवंगत पंडित पन्नालाल घोष यांच्या बासऱ्याचा संग्रह केळकर संग्रहालयाला प्रदान करण्यात आला.

पुणे - शहरातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या वस्तू संग्रहाला 10 जानेवारी 2020 ला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संस्थापक दिवंगत डॉ. दिनकर केळकर यांची 125 वी जयंती आणि वस्तुसंग्रहालयास काल (दि. 10 जाने.) शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त प्रख्यात बासरी वादक दिवंगत पंडित पन्नालाल घोष यांच्या बासऱ्यांचा संग्रह केळकर संग्रहालयाला प्रदान करण्यात आला आहे.
संग्रहालयाच्या शतक वर्षपूर्तीचे औचित्य साधून 2020 या संपूर्ण वर्षांमध्ये विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम 'राजा केळकर संग्रहालय पुणे स्ट्रेम महोत्सव' या अंतर्गत आयोजित करण्याचा संग्रहालयाचा प्रयत्न आहे. या उपक्रमाची सुरुवात होत असतानाच केळकर संग्रहालयाला एक अनोखी भेट मिळाल्या आनंद व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा - पर्यटकांना माळशेज घाटात पतंग महोत्सवाची भूरळ; शाळकरी मुलांचाही सहभाग
मुंबईतील संग्रहक विश्वास कुलकर्णी यांनी जमवलेला प्रख्यात बासरीवादक दिवंगत पंडित पन्नालाल घोष यांच्या बासऱ्यांचा हा संग्रह असून 1911 ते 1960 या काळात पंडित पन्नालाल घोष यांनी या बासर्या वापरल्या होत्या एकंदरीतच केळकर वस्तुसंग्रहालयाच्या वस्तुसंग्रहास शंभर वर्षे पूर्ण होत असताना ही अनोखी भेट संग्रहालयाला मिळाली आहे.
हेही वाचा - बारामतीत अजित पवारांचे जंगी स्वागत, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक
anchor
पुण्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या राजा दिनकर केळकर संग्रहालया च्या वस्तू संग्रहाला 10 जानेवारी 2020 ला शंभर वर्षं पूर्ण होत आहेत, राजा दिनकर केळकर संग्रहालय चे संस्थापक कै. डॉक्टर दिनकर केळकर यांची 125 वी जयंती आणि वस्तुसंग्रहास शंभर वर्ष 10 जानेवारीला पूर्ण होत आहेत याचे औचित्य साधून 2020 या संपूर्ण वर्षांमध्ये विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम 'राजा केळकर संग्रहालय पुणे स्ट्रेम महोत्सव' या अंतर्गत आयोजित करण्याचा संग्रहालयाचा प्रयत्न आहे या उपक्रमाची सुरुवात होत असतानाच केळकर संग्रहालयाला एक अनोखी भेट मिळाली आहे , प्रख्यात बासरी वादक कै. पंडित पन्नालाल घोष यांच्या बासऱ्याचा संग्रह केळकर संग्रहालयाला प्रदान करण्यात आला आहे, मुंबईतील संग्रहक विश्वास कुलकर्णी यांनी जमवलेला प्रख्यात बासरीवादक कै. पंडित पन्नालाल घोष यांच्या बासऱ्यांचा हा संग्रह असून 1911 ते 1960 या काळात पंडित पन्नालाल घोष यांनी या बासर्या वापरल्या होत्या एकंदरीतच केळकर वस्तुसंग्रहालयाच्या वस्तुसंग्रहास शंभर वर्षे पूर्ण होत असताना ही अनोखी भेट संग्रहालयाला मिळाली आहे....Conclusion: