जुन्नर (पुणे) - शेतकऱ्याचा खरा सोबती म्हणजे बैल. शेतकऱ्याबरोबर दिवसभर हाच बैल शेतात काबाड कष्ट करतो. सध्या खरिपाचा हंगाम सुरू झाला असून काही ठिकाणी पाऊसाच्या सरी बरसल्या तर काही ठिकाणी पावसाची प्रतिक्षा आहे. त्यामुळे, शेतकरी शेतीच्या मशागतीच्या व पेरणीसाठी बैल खरेदीला बैलबाजारात जात आहे.
प्रतिक्रिया देताना शेतकरी व व्यापारी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्हे बैलबाजार आहे. हा बैलबाजार पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला सर्वात मोठा बैलबाजर आहे. प्रत्येक सोमवारी या बैलबाजरात बैल खरेदी-विक्रीसाठी मोठी गर्दी होते. बेल्ह्याच्या बैलबाजारात गावठी, खिलार, भडुशी आणि जर्शी जातीचे बैल विक्री साठी आलेत. सुमारे 40 ते 80 हजारापर्यंचा भाव बैलजोडीला मिळतो. बैलांचा रंग, शिंगे, वशिंग, दात आणि बैलांची उंची यावर हे दर ठरतात. कोरोनामुळे हा बैल बाजार मागील 3 महिन्यापासून बंद होता. मागील 2 आठवड्यापासून तो सुरू झला आहे. काही ठिकाणी पावसाने हुलकावणी दिल्याने बैलबाजारात बैलांची आवक वाढली आहे. मात्र, भाव स्थिर आहेत. जून महिन्यात पाऊस सगळीकडे चांगला बरसला आहे. यामुळे शेतीच्या पूर्वमशागतीच्या कामासाठी व पेरणीसाठी बळीराजा बैलखरेदी-विक्रीसाठी बैलबाजारात मोठी गर्दी करु लागला आहे. कोरोनाच्या महामारीत शेतकरी आर्थिक संकटात सापडला याच शेतकऱ्यांचा सोबती असलेला बैल काहींना हवाहवासा झाला आहे. तर काहींना नकोसा झालाय, असे चित्र बैलबाजारात पाहायला मिळत आहे.हेही वाचा - 'तुझे पिस्टल खोटे आहे' असे म्हणताच केला होता गोळीबार; फरार आरोपीला अटक