ETV Bharat / state

Anil Jadhav : बालनिरीक्षण गृहातील अनाथ अनिल जाधव बनले शासनाचे अधिकारी - child observation home Baramati

अनिल जाधव यांनी अनाथ (orphan Anil Jadhav) म्हणून बारामती येथील बाल निरीक्षण गृह या ठिकाणी दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यक कक्ष अधिकारी पदी निवड झाली (Anil Jadhav became government officer) आहे. जाधव यांच्या या यशाबद्दल बाल निरीक्षण गृहाकडून तसेच बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी अभिनंदन केले.

Anil Jadhav
अनिल जाधव
author img

By

Published : Dec 16, 2022, 11:18 AM IST

पुणे : काही वर्षांपूर्वी अक्षर ओळख होण्यापूर्वीच अगदी लहान वयात बारामती येथील बाल निरीक्षण गृहात दाखल झालेले अनाथ विद्यार्थी अनिल माणिक जाधव याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यक कक्ष अधिकारी पदी निवड झाली (orphan Anil Jadhav from child observation home) आहे.

लोकसेवा आयोगामार्फत निवड : अनिल जाधव यांनी (orphan Anil Jadhav) बारामती येथील बाल निरीक्षण गृह या ठिकाणी दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांना जवळचे कोणीही नातेवाईक नाहीत. बाल निरीक्षण गृहातील इतर साथीदार हेच त्यांची भावंड व बाल निरीक्षण गृहातील सर्व अधिकारी वर्ग हेच त्यांचे पालक आहेत. जाधव यांनी येथील बाल निरीक्षण गृहात असणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत. त्याचा लाभ उठवत त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. दहावीनंतर त्यांनी आयटीआय व पुढे बारावी पूर्ण केली. नंतर त्यांनी काम करत एमएपर्यंतच शिक्षण पूर्ण केले. अनिल जाधव हे केवळ उच्च शिक्षण घेऊनच थांबले नाहीत. तर कष्ट करत करत त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणे सुरू ठेवले. त्यांची महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय या ठिकाणी लोकसेवा आयोगामार्फत निवड झाली (Anil Jadhav became government officer) आहे.

अधिकारी बनण्याचे स्वप्न : एकीकडे आज अनेक सुशिक्षित पालकांची मुले इंटरनेटच्या मायावी जाळ्यात अडकून सोशल मीडिया ॲपमध्ये रात्रंदिवस डोके घालून खऱ्या शिक्षणापासून भरकटत आहेत. तर अनिल जाधव यांनी डोक्यावर कोणाचाही हात नसताना, आपुलकीची माया लावणारा कोणी नसताना त्यांनी एक उच्च अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. खरोखर ही गोष्ट समाजातील सर्व मुलांना आदर्शवत आहे. आज विधी संघर्ष ग्रस्त बालकांची व ज्या बालकांना काळजीची गरज आहे, अशा दोन्ही प्रकारच्या बालकांची समस्या सतावत असताना, अनिल जाधव यांचे यश निश्चितपणे आशेचा किरण आहे. खरंच अनाथ ते नाथ हा प्रवास अनिलचा थक्क करणारा आहे. आजपासून अनिल हे सर्वसामान्यांचा नाथ बनले आहेत. जाधव यांच्या या यशाबद्दल बाल निरीक्षण गृहाकडून तसेच बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी अभिनंदन (child observation home Baramati) केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.