पुणे - मेट्रो कारशेडवरून केंद्र आणि राज्य सरकारमधील वाद सुरू असल्याने राज्यातील भाजप नेते आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मला विरोधक अहंकारी म्हणतात. हो माझ्या महाराष्ट्रसाठी मी अहंकारी आहे. केवळ एका लाइनसाठी मेट्रोचे कारशेड आरेमध्ये कशाला? हे किती योग्य आहे. आरे शहरातील हे एकमेव जंगल आहे. कांजूरमार्गच्या जागेचा वाद केंद्राने आणि राज्याने चर्चेतून सोडवला पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज म्हणाले. त्यावर पुण्यात देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.
फडणवीस म्हणाले -
- या सरकारने हाय पॉवर कमिटी तयार केली
- या कमिटीने दिलेला रिपोर्ट हे सरकार का वाचत नाही
- मेट्रो 2024 मध्ये येईल
- आरेतल्या कारशेडवर 100 कोटी पेक्षा जास्त खर्च झालेत
- केंद्र सरकारने सुद्धा फंड दिलाय
- आरेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलाय
- आरे मध्ये बांधकाम केल्याशिवाय प्रकल्प पूर्ण होणार नाही
- फक्त राज्य सरकारचा हा प्रोजेक्ट नाही
- मुख्यमंत्र्यांनी म्हणावं, आपण सगळे मिळून ठराव करुयात, यापुढे यापेक्षा जास्त जागा देणार नाही
- भविष्यात जास्त जागा लागणार नाही
- बिकेसी चा पर्याय पूर्ण अयोग्य आहे
- मुख्यमंत्र्यांनी सर्व श्रेय घ्यावं
- लवकर मेट्रो सुरु करावी
- मेट्रो सोबत आम्ही भावनिक जोडले गेलो आहोत
- तोडगा कोणीही काढावा आम्हला आनंद आहे
- जी मेट्रो 2021 साली सुरू होणार ती 2024 मध्ये का द्यायची
- पवार साहेबांनी मोदींशी बोलावं, उद्धव ठाकरे यांनी ही बोलावं, हरकत नाही
- पवार साहेब जेव्हा अहवाल वाचलीत तेव्हा ते विरोध करणार नाहीत