पुणे : महापुरुषांच्या विचाराने आम्ही पुढे चाललो आहोत. त्यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही. आत्ताचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil ) म्हणतात महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भिक मागून शाळा काढल्या. या वक्तव्याचा समाचार घेताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, आम्ही जर म्हटले की तू भिकारड्यासारखा बोलतोस, तर काय वाटेल ? पण आम्ही तसे म्हणणार नाही. 'अरे ला का रे' आम्हालाही करता येते. 'ब'ची भाषा तर आम्हाला लय चांगली जमती. पण आम्हाला तसे बोलायचे नाही. वागायचे नाही. तशी आमची संस्कृती नाही. वडीलधाऱ्यांचे संस्कार नाहीत. असे म्हणत पवारांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार (Ajit Pawar criticized Chandrakant Patil) घेतला.
शेतकऱ्यांशी संवाद : विरोधी पक्ष नेते अजित पवार काल इंदापूर दौऱ्यावर होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शरद कृषी महोत्सवात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना पवार म्हणाले की, भाजपचे अनेक वाचाळ वीर महापुरुषांबद्दल अवमानकारक शब्दांचा वापर करत आहेत. याचा अतिरेक झाला आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी येत्या 17 डिसेंबर रोजी मुंबईत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला उपस्थित राहण्याचे आवाहन पवार यांनी यावेळी (Chandrakant Patil on contraversial statement ) केले.
लेखी आदेश काढावा : महाराष्ट्रातील मोठे मोठे प्रकल्प दुसरा राज्यात नेले जात आहेत. पुण्यातील दीड लाख कोटी रुपयांचा प्रकल्प दुसऱ्या राज्यात नेला. दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध होणार होता. मात्र याचे उत्तर सत्ताधारी देत नाहीत, असेही पवार म्हणाले. एका बाजूला शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद करू नका म्हणून सांगतात, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केले जात आहेत. आता यांनाच कट करण्याची वेळ आली आहे, असे म्हणत वीज कनेक्शन बंद न करण्याबाबत सरकारने लेखी आदेश काढावा. असेही पवारांनी (Ajit Pawar) यावेळी सांगितले.