पुणे - कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या हापूस आणि केशर आंब्याला ग्राहक मिळावा आणि ग्राहकांना रास्त दरात दर्जेदार आंबा थेट घरी उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य कृषी पणन मंडळाने ऑनालाइन आंबा महोत्सव सुरू केला आहे. या ऑनलाइन विक्रीतून आत्तापर्यंत 40 हजार टन आंबा विक्री झाली असून हा आंबा 500 ते 800 रुपये डझन दराने विकला जात आहे.
आता पर्यंत 40 हजार टन आंब्याची ऑनलाइन विक्री
मागील टाळेबंदीच्या काळापासून आंबा खरेदी-विक्रीसाठी ऑनलाइन पोर्टल कार्यरत करण्यात आलेले असून यावर आंबा उत्पादक तसेच ग्राहक नोंदणी करू शकतात. या पोर्टलद्वारे गृहनिर्माण संस्थेमधील जास्तीत जास्त सभासदांनी एकत्रित नोंदणी केल्या आहे. त्यामुळे कोकणातील आंबा उत्पादकांना थेट सोसायटीमध्ये आंबा पुरविण्यात येत आहे. आतापर्यंत 40 हजार टन आंबा ऑनलाइन विक्री झाली यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असल्याचे पणन मार्केटिंग मॅनेजर मंगेश कदम यांनी माहिती दिली आहे. अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, बारामती, सांगली, सातारा या ठिकाणी ही विक्री झाली आहे. केशर आंब्याला 150 ते 160 भाव मिळाला असून यावर्षी ऑनलाइन विक्रीचा फायदा शेतकऱ्यांना ही झाला आहे.
पुणे शहरात तीन हजार डझनाइतका आंबा विक्री
राज्य कृषी पणन मंडळामार्फत उत्पादक शेतकरी ते थेट ग्राहक विक्री योजनेंतर्गत सुरू असलेल्या आंबा महोत्सवात पंधरवड्यात ऑनलाइनद्वारे सुमारे 40 हजार डझन आंब्यांची विक्री पूर्ण झाली आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील हापूस आंबा आणि सोलापूर जिल्ह्यातील केशर आंब्यांची विक्री मंडळाने ऑनलाइन सुविधेद्वारे घडवून आणली आहे. यासाठी bs.msamb.com हे खरेदी-विक्रीसाठी ऑनलाइन पोर्टल कार्यरत करण्यात आले आहे. या पोर्टलवर ग्राहकांनीपणन मंडळाने थेट ग्राहकांशी संवाद साधण्याच्या दिलेल्या सुविधेमुळे आम्हाला कायमस्वरूपी हक्काचा शहरी ग्राहक मिळाला आहे. त्यातून एकट्या पुणे शहरात तीन हजार डझनइतका आंबा विक्री करू शकलो आहे, अशी माहिती आंबा उत्पादकांनी यावेळी दिली.
किमान 50 ते 100 डझन आंब्यांची ऑर्डर नोंदविणे आवश्यक
या पोर्टलवर किमान 50 ते 100 डझन आंब्यांची ऑर्डर नोंदविणे आवश्यक आहे. ज्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी येऊन थेट सोसायटीत आंबा पुरविणे शक्य होते. तसेच मंडळाच्या मँगो सेलद्वारे आंब्यांचे कामकाज करण्यात येत आहे. अगदी 2 ते 10 डझनची ऑर्डरही संपर्क व समन्वयाद्वारे पूर्ण करण्यात आली आहे. हापूस आंब्यांची विक्री प्रति डझनास 500 ते 800 रुपये याप्रमाणे झाली आहे. केशर आंब्यांची विक्री 150 ते 160 रुपये किलोप्रमाणे होत आहे.
हेही वाचा - 55 टन कांद्याला आग, 9 लाखांचे नुकसान