पुणे- सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याने कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. त्यावर उपाययोजना करत शेतकऱ्याने कांद्याची साठवण केली आहे. मात्र, १ मेच्या रात्रीच्या सुमाराम शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बबन भिकाजी गोसावी या शेतकऱ्याच्या कांद्याची साठवण केलेल्या चाळीला अज्ञात समाजकंटकाने आग लावल्याची घटना घडली आहे. या आगीत कांदाचाळ जळून खाक झाली आहे.
मोठ्या भांडवली खर्चातून शेतकरी कांद्याचे पिक घेत असतो त्यातुन चांगला बाजारभाव मिळावा ऐवढी माफक अपेक्षा असताना कांदा काढणीच्या वेळीच कांदा कवडीमोल बाजारभावाने विक्री होतो. त्यातुन कष्टाची मजुरीही मिळत नाही. त्यामुळे काही शेतकरी चांगल्या बाजारभावाची वाट पाहत कांद्याची साठवण करतात. मात्र, बाजारभाव कधी मिळतच नाही. त्यातून अशा दुर्दैवी घटना घडतात, त्यामुळे शेतकऱ्यांचे यातुन कंबरडेच मोडले जाते.