ETV Bharat / state

कांदा-लसूण संशोधन केंद्रात कांद्याच्या दहा तर लसणाच्या दोन जाती विकसीत - कांदा लसुन संशोधन केंद्र

कांदा-लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर यांनी कांद्याच्या दहा जातींची निर्मिती केली असून नवीन तंत्रज्ञानाने कांद्याची साठवणूक करण्यासाठी साठवणूक गृहाची निर्मिती केली आहे.

pune
कांदा लसुन संशोधन केंद्रात कांद्याच्या दहा तर लसणाच्या दोन जाती विकसीत
author img

By

Published : Dec 21, 2019, 12:49 PM IST

पुणे - कांदा हा देशातील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्वाचा घटक झाला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कांद्याने प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणले आहे. कधी वातावरणातील बदलामुळे रोगराई, अवकाळी पाऊस यामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाल्यामुळे कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन बाजारभाव गगनाला भिडले आहे. यावर आता कांदा लसुन संशोधन केंद्र राजगुरुनगर यांनी कांद्याच्या दहा जातींची निर्मिती केली असुन नवीन तंत्रज्ञानाने कांद्याची साठवणूक करण्यासाठी साठवणूक गृहाची निर्मिती केली आहे.

कांदा लसुन संशोधन केंद्रात कांद्याच्या दहा तर लसणाच्या दोन जाती विकसीत

हेही वाचा - राज्यात बिन पैशाचा तमाशा सुरू - राज ठाकरे

राजगुरुनगर येथील कांदा-लसूण संशोधन केंद्र हे देशातील एकमेव कांदा आणि लसूण संशोधन केंद्र असून या संशोधन केंद्रात कांद्याच्या दहा जाती आणि लसणाच्या दोन जातींची निर्माती केली आहे. मात्र, सध्या खरीप हंगामात तयार होणाऱ्या जातींचा कांदा एक महिन्यापेक्षा जास्त टिकत नाही. तर रब्बी हंगामात तयार होणाऱ्या जातींचे कांदे पाच महिने साठवणीत टिकतात. त्यातही जातीपरत्वे बराच फरक पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एन २-४-१, अ‌ॅग्रीफाऊंड लाइर्ट रेड किंवा अर्का निकेतन या जाती सहा महिने साठवणीत विशेष घट न होता चांगल्या टिकू शकतात. भीमा किरण, भीमा शक्ती या नवीन जातीदेखील साठवणीत चांगल्या टिकतात. त्यामुळे या जातीच्या कांद्याची लागवड करण्याचे आवाहन कांदा लसुन केंद्राचे संशोधक विजय महाजन यांनी केले आहे.

हेही वाचा - 'जनादेशाचा अनादर करणारे हे सरकार जास्त काळ टिकणार नाही'

खते आणि पाणी नियोजन

कांदा लागवडीनंतर ६० दिवसांच्या आता रासायनिक खते कमी प्रमाणात वापरुन सेंद्रिय खतांचा वापर करावा. उशिरा खतांचा वापर केल्यास कांद्याच्या माना जाड होतात याची काळजी घ्यावी. खतांमध्ये अमोनियम सल्फेट ऑफ पोटॅश किंवा सुपर फॉस्फेटचा वापर केला तर गंधकाची गरज आपोआप पूर्ण केली जाते. मात्र, अलीकडे संयुक्त दाणेदार खतांचा वापर जास्त होत असल्यामुळे त्यातून फक्त नत्र, स्फुरद आणि पालाश हीच अन्नद्रव्ये मिळतात. कांद्याला पाणी देत असताना काळजी घेण्याची गरज असते. वातावरणातील तापमानाचा अंदाज घेऊनच गरजेप्रमाणे पाणी द्यावे. कारण पाण्याचे जास्त प्रमाण झाल्याने कांद्याच्या माना जाड होतात आणि जोड कांद्याचे प्रमाण वाढते. काढणी अगोदर २ ते ३ आठवडे कांद्याचे पाणी बंद करावे.

साठवणुकीसाठीचे नियोजन

  • कांदा सुकवणे

काढणीनंतर कांदा शेतातच पातीसह सुकुन द्यावा. कांद्याच्या ओळी पहिल्या ओळीतील कांदा दुसऱ्या ओळीतील पाल्याने झाकला जाईल, अशा पद्धतीने कांदा शेतात चार दिवस पुर्ण सुकेल याची काळजी घ्यावी. त्यानंतर चार सेंमी लांब मान ठेवून पात कापणी करावी. चिंगळी, जोड कांदा आणि डेंगळे आलेले कांदे वेगळे काढावेत. राहिलेला कांदा सावलीत ढीग करून १५ दिवस सुकवावा. या काळात कांद्याच्या माना वाळून पिरगळतात, वरचा पापुद्रा वाळून कांद्याला घट्ट चिकटतो. अशा प्रकारे वाळलेला कांदा अधिक काळ साठवणुकीत चांगला टिकतो.

  • साठवणगृहातील वातावरण

चांगल्या साठवणीसाठी साठवणगृहात ६५ ते ७० टक्के आर्द्रता, तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान असावे लागते. नैसर्गिक वायुविजनाचा वापर करून साठवणगृहाची रचना केली, तर तापमान आणि आर्द्रता काही अंशी मर्यादित ठेवून साठवणीतील नुकसान कमी करता येते.

  • नैसर्गिक कांदा चाळीची रचना

कांदा चाळीचे दोन प्रकार असतात. नैसर्गिक वायुविजनाचा वापर करून उभारलेले चाळ आणि विद्युत ऊर्जेचा वापर करून बनवलेली शीतगृहे विकसित करण्यात आली आहेत. यामध्ये नैसर्गिक वायुविजनावर आधारित चाळ ही एक पाखी आणि दोन पाखी या दोन प्रकारची असतात. एक पाखी चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर उभारावी तर दोन पाखी चाळीची उभारणी पूर्व-पश्‍चिम उभारावी. चाळीची लांबी ५० फुटांपेक्षा जास्त असू नये. तळाशी हवा खेळती असावी, तसेच बाजूच्या भिंतीदेखील लाकडाच्या किंवा बांबूच्या असाव्यात. त्यामध्ये हवा खेळती रहाण्यासाठी अंतर असावे. चाळीसाठी उंचावरची आणि पाणी न साठणारी जागा निवडावी. चाळीभोवतीची जागा स्वच्छ असावी. तळाशी मुरूम, वाळूचा थर द्यावा. त्यानंतर चाळीची उभारणी करावी. तळाशी एक फुटाची मोकळी जागा ठेवावी. चाळीचे छप्पर शक्‍यतो उसाच्या पाचटाने झाकावे. सिमेंट किंवा पन्हाळी पत्र्यांनी चाळीत उष्णता वाढते. सिमेंट पत्रे व त्यावर उसाच्या पाचटाचे आच्छादन केले तर तापमान कमी राहण्यास मदत होते. चाळीचे छप्पर उतरते असावे. उभ्या भिंतीच्या तीन फूट पुढे असावे. त्यामुळे पावसाचे ओसाडे कांद्यापर्यंत पोहोचणार नाही.

  • कांदा साठवणुकीसाठी विद्युतशीतगृह

शीतगृहामध्ये (+ -) ० ते २ अंश सेल्सिअस तापमान व ६५ टक्के आर्द्रता राखली जाते. अशा वातावरणात कांदे ८ ते १० महिने चांगले राहू शकतात. वजनात अजिबात घट होत नाही, तसेच सडत देखील नाही.

कांदा व लसूण संशोधन केंद्राने भाभा अणू ऊर्जा संशोधन केंद्राच्या मदतीने कांद्यावर विकिरणांचा वापर करून कांदा साठवणूकीसाठी शीतगृह व नैसर्गिक वायुविजनावर आधारित चाळीत ठेवून प्रयोग केले आहेत. कांद्याच्या साठवणुकीसाठी शीतगृहाचा वापर जास्त कांद्यासाठी केला जावा. त्यामुळे खर्च कमी येतो व योग्य बाजारभाव आला कि कांद्याची विक्री करावी.

Intro:Anc_कांदा हा देशातील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्वाचा घटक झाला आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून कांद्याने प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणले आहे कधी वातावरणातील बदलामुळे रोगराई,अवकाळी पाऊस यामुळे कांद्याचे मोठं नुकसान झाले त्यामुळे कांद्याचा तुटवडा निर्माण होऊ लागल्याने कांद्याचे बाजारभाव गगणाले भिडले आहे यावर आता कांदा लसुन संशोधन केंद्र राजगुरुनगर यांनी कांद्या दहा जातींची निर्मिती केली असुन नवीन तंत्रज्ञानाने कांद्याची साठवणुक करण्यासाठी साठवणूक गृहाची निर्मिती केली आहे

राजगुरुनगर येथील कांदा लसुन संशोधन केंद्र हे देशातील एकमेव कांदा व लसुन यावर संशोधन करणारे केंद्र असुन या संशोधन केंद्रात कांद्याच्या दहा जाती व लसुनाच्या दोन जातींची निर्माती केली आहे मात्र सध्या खरिप हंगामात तयार होणाऱ्या जातींचा कांदा एक महिन्यापेक्षा जास्त टिकत नाही.तर रब्बी हंगामात तयार होणाऱ्या जातींचे कांदे पाच महिने साठवणीत टिकतात. त्यातही जातीपरत्वे बराच फरक पडत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी एन २-४-१, ॲग्रिफाऊंड लाइर्ट रेड किंवा अर्का निकेतन या जाती सहा महिने साठवणीत विशेष घट न होता चांगल्या टिकू शकतात. भीमा किरण, भीमा शक्ती या नवीन जातीदेखील साठवणीत चांगल्या टिकतात.त्यामुळे या जातीच्या कांद्याची लागवड करण्याचे आवाहन कांदा लसुन केंद्राचे संशोधक विजय महाजन यांनी केले आहे

खते आणि पाणी नियोजन..
कांदा लागवडीनंतर ६० दिवसांच्या आता रासायनिक खते कमी प्रमाणात वापरुन सेंद्रिय खतांचा वापर करावा उशिरा खतांचा वापर केल्यास कांद्याच्या माना जाड होतात याची काळजी घ्यावी खतांमध्ये अमोनियम सल्फेट ऑफ पोटॅश किंवा सुपर फॉस्फेटचा वापर केला तर गंधकाची गरज आपोआप पूर्ण केली जाते मात्र अलीकडे संयुक्त दाणेदार खतांचा वापर जास्त होत असल्यामुळे त्यातून फक्त नत्र, स्फुरद व पालाश हीच अन्नद्रव्ये मिळतात, कांद्याला पाणी देत असताना काळजी घेण्याची गरज असते वातावरणातील तापमानाचा अंदाज घेऊनच गरजेप्रमाणे पाणी द्यावे कारण पाण्याचे जास्त प्रमाण झाल्याने कांद्याच्या माना जाड होतात व जोड कांद्याचे प्रमाण वाढते आणि काढणीअगोदर २ ते ३ आठवडे कांद्याचे पाणी बंद करावे

साठवणुकीसाठीचे नियोजन : 
कांदा सुकवणे...
काढणीनंतर कांदा शेतातच पातीसह सुकुन द्यावा. कांद्याच्या ओळी पहिल्या ओळीतील कांदा दुसऱ्या ओळीतील पाल्याने झाकला जाईल.अशा पद्धतीने कांदा शेतात चार दिवस पुर्ण सुकेल याची काळजी घ्यावी त्यानंतर चार सें.मी. लांब मान ठेवून पात कापानी करावी चिंगळी, जोड कांदा व डेंगळे आलेले कांदे वेगळे काढावेत. राहिलेला कांदा सावलीत ढीग करून १५ दिवस सुकवावा. या काळात कांद्याच्या माना वाळून पिरगळतात, वरचा पापुद्रा वाळून कांद्याला घट्ट चिकटतो. अशा प्रकारे वाळलेला कांदा अधिक काळ साठवणुकीत चांगला टिकतो. 

साठवणगृहातील वातावरण..
चांगल्या साठवणीसाठी साठवणगृहात ६५ ते ७० टक्के आर्द्रता, तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान असावे लागते. नैसर्गिक वायुविजनाचा वापर करून साठवणगृहाची रचना केली तर तापमान व आर्द्रता काही अंशी मर्यादित ठेवून साठवणीतील नुकसान कमी करता येते.

नैसर्गिक कांदा चाळीची रचना..
कांदा चाळीचे दोन प्रकार असतात. नैसर्गिक वायुविजनाचा वापर करून उभारलेले चाळ आणि विद्युत ऊर्जेचा वापर करून बनवलेली शीतगृहे विकसित करण्यात आली आहेत यामध्ये नैसर्गिक वायुविजनावर आधारित चाळ ही एक पाखी आणि दोन पाखी या दोन प्रकारची असतात. एक पाखी चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर उभारावी तर दोन पाखी चाळीची उभारणी पूर्व-पश्‍चिम उभारावी चाळीची लांबी ५० फुटांपेक्षा जास्त असू नये. तळाशी हवा खेळती असावी, तसेच बाजूच्या भिंतीदेखील लाकडाच्या किंवा बांबूच्या असुन त्यामध्ये हवा खेळती रहाण्यासाठी अंतर असावे चाळीसाठी उंचावरची व पाणी न साठणारी जागा निवडावी. चाळीभोवतीची जागा स्वच्छ असावी. तळाशी मुरूम, वाळूचा थर द्यावा. त्यानंतर चाळीची उभारणी करावी. तळाशी एक फुटाची मोकळी जागा ठेवावी.चाळीचे छप्पर शक्‍यतो उसाच्या पाचटाने झाकावे. सिमेंट किंवा पन्हाळी पत्र्यांनी चाळीत उष्णता वाढते. सिमेंट पत्रे व त्यावर उसाच्या पाचटाचे आच्छादन केले तर तापमान कमी राहण्यास मदत होते.चाळीचे छप्पर उतरते असावे. ते उभ्या भिंतीच्या तीन फूट पुढे असावे, त्यामुळे पावसाचे ओसाडे कांद्यापर्यंत पोचणार नाही

कांदा साठवणूकीसाठी विद्युतशीतगृह ...
शीतगृहामध्ये (+ -)  ० ते २ अंश सेल्सिअस तापमान व ६५ टक्के आर्द्रता राखली जाते. अशा वातावरणात कांदे ८ ते १० महिने चांगले राहू शकतात. वजनात अजिबात घट होत नाही, तसेच सडदेखील होत नाही;
कांदा व लसूण संशोधन केंद्राने भाभा अणू ऊर्जा संशोधन केंद्राच्या मदतीने कांद्यावर विकिरणांचा वापर करून कांदा साठवणूकीसाठी शीतगृह व नैसर्गिक वायुविजनावर आधारित चाळीत ठेवून प्रयोग केले आहेत कांद्याच्या साठवणुकीसाठी शीतगृहाचा वापर जास्त कांद्यासाठी केला जावा त्यामुळे खर्च कमी येतो व योग्य बाजारभाव आला कि कांद्याची विक्री करावीBody:Feed ftp..
mh_pun_3_onion spl_spl pkg_mh10013

Total file_9
मराठी,हिंन्दी,इंग्रजी शास्त्रज्ञ बाईट..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.