पुणे - सरपण विकण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एकाच खून झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. रामदास बाजीराव मेंगळे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
या घटनेप्रकरणी शाम मेंगळे यांनी देहूरोड पोलिसात फिर्याद दिली होती. बबन बाळु मेंगळे आणि गणपत बारकु मेंगळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी शाम यांची पत्नी जिजा आणि भाऊ रामदास यांच्यामध्ये सरपण विकण्यावरुन वाद झाले होते. याच वादातून पत्नी जिजा हिने भाऊ बबन मेंगळे याला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. रात्रीच्या सुमारास आरोपी बबन मेंगळे हा त्याचा चुलत भाऊ गणपत मेंगळे याला घेऊन झेंडेमळा येथे आला. या दोघांनी कुटुंबातील सर्वांना लाकडी दांडक्याने आणि लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. याच मारहाणीत रामदासचा मृत्यू झाला. तो निपचित पडला होता त्याला महानगरपालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र, त्याला डॉक्टरांनी तपासण्यापूर्वी मृत घोषित केले. घटनेनंतर काही तासातच संबंधित आरोपीला देहूरोड पोलिसांनी जेरबंद केले.