ETV Bharat / entertainment

विवियन डिसेनानं सिद्धार्थ शुक्लाबद्दल उघडलं शोमध्ये रहस्य, वाचा सविस्तर - VIVIAN DSENA

विवियन डिसेनानं सिद्धार्थ शुक्लाचं नाव न घेता त्याच्याबद्दल एक रहस्य उघड केलं आहे.

Vivian Dsena
विवियन डिसेना (विवियन डीसेना-सिद्धार्थ शुक्ला (IANS-ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 15, 2024, 2:10 PM IST

मुंबई : 'बिग बॉस 18'चा 'लाडला' विवियन डिसेनानं त्याला 'बिग बॉस'मधून मिळालेल्या टॅगबद्दल खुलासा केला आहे. शोच्या एपिसोडमध्ये, त्यानं ॲलिस कौशिकशी बोलताना म्हटलं की, त्याला लाडका का म्हटले जाते. टॅगबद्दल विवियननं सिद्धार्थ शुक्लाचं नाव न घेता म्हटलं, "तो खूप चांगला होता. इंडस्ट्रीतील दोनच व्यक्ती असे आहेत ज्यांच्याकडे निर्मात्यांसमोर बरोबर आणि चुकीचे म्हणण्याचे धैर्य होते." विवियनचे मत आहे की, कदाचित यामुळेच निर्माते त्याला शोचा 'लाडका' म्हणतात. या संवादामधून ॲलिस कौशिकला समजून घ्यायचे आहे की ती कुठे चुकत आहे. दरम्यान सिद्धार्थ 'बिग बॉस 13 चा विजेता होता.

टाइम गॉडसाठी नवीन टास्क : या आठवड्यात गुरुवारी 14 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये बीबी हाऊसला नवीन टाईम गॉड मिळाला. दरम्यान 'बिग बॉस 18'च्या नवीन टाईम गॉडसाठी एक नवीन टास्क सेट करण्यात आला होता. यात रजत दलाल, शिल्पा शिरोडकर आणि चाहत पांडे हे नव्या टाइम गॉडच्या शर्यतीत होते. घराचा टाइम गॉड बनण्यासाठी तिन्ही स्पर्धकांना चहा चोरावा लागला. तिघांपैकी कोणत्याही एकाला पाठिंबा देण्यासाठी, उर्वरित घरातील सदस्यांना दोन्ही स्पर्धकांच्या टोपलीतून चहा चोरून,त्यांच्या आवडत्या स्पर्धकाच्या टोपलीत टाकावा लागला. या टास्क दरम्यान, घरातील सदस्यांमध्ये बरीच बाचाबाची झाली, ज्यामध्ये अविनाश आणि दिग्विजय यांच्या जोरदार वाद झाले.

टाइम गॉड बनला रजत दलाल : रजत दलाल या टास्कमध्ये विजयी झाला आणि घरातील नवीन टाइम गॉड म्हणून त्याची निवड करण्यात आली. याशिवाय 'बिग बॉस' निर्मात्यांनी एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये 'बिग बॉस ' रजतला नॉमेनेट झालेल्या 6 सदस्यांपैकी सुरक्षित, आणि पुन्हा नॉमेनेट करायला लावतात. यामध्ये रजत हा करणवीर मेहरा आणि कशिश कपूर यांना नॉमेनेट करतो. 'बिग बॉस 18' 6 ऑक्टोबरपासून कलर्स टीव्ही आणि जिओ सिनेमावर प्रसारित होत आहे. 'वीकेंड का वार' शुक्रवार आणि शनिवारी प्रसारित होत आहे. यावेळी अफरीन खान 'वीकेंड का वार'मध्ये घराबाहेर पडला आहे.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस'च्या घरात दिग्विजय सिंह राठी आणि अविनाश मिश्रामध्ये जोरदार भांडण, कोण झालं जखमी ?
  2. 'बिग बॉस 18'च्या घरातील पायजमा पार्टीत करणवीरनं चुमकडे केल्या भावना व्यक्त, व्हिडिओ व्हायरल
  3. 'बिग बॉस 18'मध्ये विवियन डिसेना बनला पोस्टमन, आता देणार घरातील सदस्यांना धक्का

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.