पुणे - वडगाव पुलावर एका भीषण दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात घडला. ( Bike Truck Accident Pune ) मुबंई-बंगळूर महामार्गावर पुण्यातील वारजे नदीवरील पुलावरून पुढे आल्यावर सनसिटीकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात घडला. या भीषण अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. ( One died in Bike Truck Accident on Vadgaon Bridge Pune ) ही घटना रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.
ट्रकचालक फरार -
सन सिटी समोर सातार्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर स्प्लेंडर (MH12RX5146) वर असलेल्या चालकाला अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघातात ओंकार अभ्याराज सिंह (वय ३६) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे मुळगाव उत्तर प्रदेशमध्ये आहे. तो पुण्यात सध्या जनता वसाहतीत राहत होता. हेल्मेट घातलेले असतानाही दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. दुचाकी व हेल्मेटचा अक्षरश: चुराडा झाला आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक फरार झाला आहे.
हेही वाचा - Maharashtra Corona Update : राज्यात आज ११ हजार 877 कोरोना पॉझिटिव्ह, तर ओमायक्रॉनच्या 50 रुग्णांची भर
अपघात झालेल्या ठिकाणी सिंहगड पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच सिंहगड वाहतूक पोलीसही दाखल झाले आहेत. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम लागला आहे.