दौंड (पुणे) - शहरात भीषण अपघात झाला असून दुचाकीस्वाराने महामार्गावर मध्यभागी असणाऱ्या बॅरिकेट्सला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात दुचाकीस्वाराचे शीर धडावेगळे झाले आहे. तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता तर दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
रस्त्यावरील चेंबर तुटल्याने लावण्यात आले होते बॅरिकेट्स
दौंडमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गा क्र. 160 वर हा अपघात झाला आहे. काही दिवसांपासून या मार्गावरील गजानन सोसायटीजवळ बरामतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागी चेंबर तुटून तुंबले होते. त्यामुळे अपघात होऊ नये म्हणून हे बॅरिकेट्स लावण्यात आले होते.
रात्रीच्यावेळी बॅरिकेट्स दिसले नाही अन् घात झाला
रात्रीच्यावेळी भरधाव जाणाऱ्या दुचाकीस्वाराला रस्त्याच्या मधोमध असलेले बॅरिकेट्स दिसले नाही. यामुळे हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचालकाचे शीर धडावेगळे होऊन काही अंतरावर फेकले गेले. तर दुसरा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
हेही वाचा - आम्हाला दहा टक्के आरक्षण द्या, वंजारी समाजाची मगाणी
हेही वाचा - तारादुतांचे 'सारथी' कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन