पुणे - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील विधानभवन येथे आढावा बैठक पार पडली. यावेळी प्रत्येक आमदारांच्या आमदार निधीतून एक कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यावेळी नागरिकांनी निर्बंध पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, अन्यथा कडक लॉकडाउन जाहीर करावा लागेल, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
आरोग्य यंत्रणेला ना उमेद करून नये -
कोरोना संकटकाळात ससून येथील डॉक्टरांनी संप पुकारू नये. सरकारतर्फे त्यांच्या मागण्या समजून घेऊ आणि त्यातून मार्ग काढण्यात येईल. मात्र, त्यांनी टोकाची भूमिका घेतली, तर सरकारलादेखील नाईलाजास्तव निर्णय घ्यावे लागतील. तशी वेळ डॉक्टरांनी येऊ देऊ नये, असा इशारादेखील यावेळी त्यांनी दिला. तसेच आरोग्य यंत्रणेला ना उमेद करून नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
हेही वाचा - धक्कादायक! नाशकात चक्कर येऊन एका दिवसात 9 जणांचा मृत्यू