पुणे - मैत्रिणीला फिरण्याच्या बहाण्याने पर्वती टेकडीजवळील जंगलात नेत तिच्यावर मित्रानेच बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. 24 नोव्हेंबरला हा प्रकार घडला. या प्रकरणी एका 22 वर्षीय तरुणीने तक्रार दिली असून योगेश मोहन मंद्रे (वय 22 वर्षे, रा. निखील पार्क, माणिकबाग) या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्ररादार तरुणी एका मॉलमध्ये तर आरोपी योगेश एका कंपनीत काम करतो. मॉल व कंपनी हे शेजारी असल्यामुळे त्यांची ओळख झाली होती. त्यातून त्यांची मैत्री झाली होती. त्यानंतर योगेशने 24 नोव्हेंबरला रात्री तरुणीला पर्वती टेकडीवर भेटण्यासाठी बोलविले होते. त्यानुसार तरुणी त्याला भेटण्यासाठी गेली. त्यानंतर आरोपीने तिला पर्वती टेकडीच्या जंगलात नेत तिच्यावर बलात्कार केला.
घटनेनंतर तरुणी घरी गेली होती. त्यानंतरही योगेश तिला सतत त्रास देत असल्याने तिने पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस तपास करीत आहेत.
हेही वाचा - सारथी संस्थेत सुरू असलेले तारादूत आंदोलन 17 दिवसांनंतर मागे..
हेही वाचा - सीसीटीव्ही : हिंजवडीत भरधाव चारचाकी शिरली दुकानात; सुदैवाने जीवितहानी नाही