ETV Bharat / state

Pune Crime : औषधे वाहतूकीच्या नावाखाली अवैधरीत्या होणाऱ्या विदेशी दारू वाहतुकीवर कारवाई, ८६ लाखांचा मुद्देमाल जप्त - राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

पुण्यात गोवा राज्य निर्माण व गोवा राज्यात विक्रीकरीता असलेल्या विदेशी मद्याची अवैधरीत्या तस्करी करण्यात आली. यात पोलिसांनी एकाला अटक केली आहे. एकूण ८६,००,१६० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Pune Crime
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
author img

By

Published : Mar 13, 2023, 10:00 AM IST

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर गोवा राज्य निर्माण व फक्त गोवा राज्यात विक्रीकरीता असलेल्या विदेशी मद्याची अवैधरीत्या तस्करी करण्यात येत आहे. यावर राज्य उत्पादन शुल्काकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे. अश्यातच आता राज्य उत्पादन शुल्काकडून औषध वाहतूक करण्याच्या नावाखाली गोवा राज्य निर्माण व फक्त गोवा राज्यात विक्रीकरीता असलेल्या विदेशी मद्याची अवैधरीत्या तस्करी करून वाहतूक करणाऱ्या ट्रकवर राज्य उत्पादन शुल्काकडून धडक कारवाई करण्यात आली. यात एकूण ८६,००,१६० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कारवाईत एकाला अटक : या कारवाईमध्ये शंकरलाल जोशी वय ४६ वर्षे याला अटक केली आहे. व्यवसाय-ट्रक चालक राहणार जैन मोहल्ला, तालूका सलुंबर, जिव्हा उदयपूर राजस्थान याला जागीच अटक केली आहे. या गुन्हयामध्ये ओमपूरी नावाचा इसम फरार झाला आहे. अटक आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ कलम ६५ (अ) (ई) ८१.८३,९०, १०२, १०८ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई : राज्य उत्पादन शुल्क पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली व मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क तळेगाव, दाभाडे विभाग या कार्यालयाच्या पथकामार्फत ही कारवाई करण्यात आली. कारवाईत पथकाने वाहतूक करणारा भारत बेंझ कंपनीचा एक कंटेनर ट्रक जप्त केला. या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हयातील विविध ब्रँडचे विदेशी मद्याच्या व बिअरच्या बाटल्या मिळून आल्या. एकूण ८४५ बॉक्स असा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. या कारवाईमध्ये वाहनासह एकूण रुपये ८६,००,१६०/- इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ग्रामीण भागात तस्करी : चंद्रपूर शहरात मोठ्या दारू विक्रेत्याची ग्रामीण भागात तस्करी पहायला मिळाली. होळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला, त्याशिवाय एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.6 मार्चला रविवारी सायंकाळी साडे सात वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने एक गाडी पकडली. त्यात साडे पाच लाखांचा मुद्देमाल पकडण्यात आला. अरविंद नेवलकर याला अटक करण्यात आली. गाडीतून देशी दारूच्या 75 बॉक्स तर ओसी कंपनीच्या 45 बाटल्या पोलिसांना सापडल्या आहेत. प्रकाश बलकी यांच्या नेतृत्वात मूल मार्गावर त्यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा : Satara Crime : जेवताना शिवीगाळ केल्याच्या रागातून मुलाने केली पित्याची हत्या, गावच्या यात्रेवर शोककळा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.