पुणे - अहमदनगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेवरती असलेल्या वडनेर बुद्रुक येथे बिबट्याने 70 वर्षीय महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात 70 वर्षीय महिलेच्या शरीराचे सर्व अवयव वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले आढळुन आले. राधाबाई कारभारी वाजे, असे मृत महिलेचे नाव आहे.
हेही वाचा - जन्मताच ती ठरली 'नकोशी', पुणे-नाशिक महामार्गावर आढळले मृत अर्भक
आज (शनिवार) पहाटेच्या सुमारास राधाबाई वाजे ही महिला घराच्या बाजुलाच शौचालयास जात होती. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करत अतिशय निघृणपणे महिलेची शिकार केली. हा हल्ला ऐवढा भयानक होता की महिलेचे सर्व अवयव वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले पाहायला मिळाले आहेत. यामुळे वडनेर बुद्रुक परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. पोलीस व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
हेही वाचा - पुणे : गणेशोत्सवात शेवटचे 6 दिवस रात्री 12 पर्यंत देखावे राहणार सुरू - चंद्रकांत पाटील
गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर हा लोकवस्तीत पाहायला मिळत होता. बिबट पाळीव प्राण्यांवर हल्ला करत होता. मात्र, आता हाच बिबट माणसांवर हल्ला करू लागल्याने वनविभागाने ता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.
हेही वाचा - राजकारण सोडुन देईल पण भाजपात जाणार नाही - दिलीप वळसे पाटील