पुणे: पुणे येथे अतिक्रमनावर कारवाई करत असलेल्या पथकावर हल्ला केला गेला व यात जेसीबी चालक तसेच दोन अभियंत्यांना मारहाण करण्यात आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. या दगडफेक व मारहाणीसंदर्भात सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल दुकानदानांवर चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडफेक आणि मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.
मोठी कारवाई: औंध येथील बेकायदेशीर फर्निचर,फळ विक्रेत्यांसह इतर दुकानावर पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या पथकाकडून सुमारे ५० ते ६० हजार चौरस फुटाच्या बांधकामावर कारवाई करुन जागा मोकळी केली गेली. यापुढेही मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येऊन दुकानदारांना तिथे कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करू दिला जाणार नसल्याचे पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ही कारवाई अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप, अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे, कनिष्ठ अभियंता गजानन सारणे, विठ्ठल मुळे, रोहित दिवटे, उदय कोद्रे, सुनील कदम व इतर कर्मचारी यांच्या सहकार्याने तसेच पोलीस बंदोबस्तात पार पडली.
बांधकाम पाडले: बेकायदेशीरपणे उभारलेल्या दुकानांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे पथक मंगळवारी सकाळी स्पायसर कॉलेज परिसरात दाखल झाले होते. त्यावेळी तेथील दुकानदारांनी बेकायदेशीरपणे जमाव जमवून पथकावर दगडफेक केली. तसेच जेसीबी चालक व दोन अभियंत्यांना मारहाण केली. या घटनेनंतरही अतिक्रमण विभागाच्या पथकाने कारवाई सुरुच ठेवली. पथकाने 50 ते 60 हजार फुटांचे बांधकाम पाडले आहे.
हेही वाचा: Pune Crime : मांजरीने लावले दोन बायकांमध्ये भांडण; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात