पुणे : अजित पवार यांनी भाजपच्या साथीने पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीतील 9 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप झाला. तसेच राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. काही आमदार हे अजित पवारांच्या बाजूने आहेत. तर काही आमदार हे शरद पवार यांच्या बाजूने असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते हे अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत.
7 जणांविरोधात गुन्हा दाखल : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यादेखील अजित पवार गटात सहभागी झाल्या असून, त्यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अश्यातच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर अश्लील कमेंट करणे भोवल आहे. अश्लील कमेंट करणाऱ्या 7 जणांविरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा केला दखल : रुपाली चाकणकर यांच्याबाबत यूट्यूबवर अश्लील शब्दांचा वापर केल्याप्रकरणी हा गुन्हा दखल करण्यात आला आहे. कलम 354 ए, 509 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे प्रकार वाढल्याने पोलिसांची चिंता वाढली आहे. तसेच हे प्रकार थोपवायचे कसे असाही प्रश्न आहे.
चाकणकर यांच्याविषयी अश्लील भाषा : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या फेसबुक लाईव्ह करत असताना विजय कुमार सारखे तसेच नितीन पाटील यांनी अश्लील शब्दात कमेंट केली होती. तसेच दुसऱ्यावेळी शरद पवार यांची नाशिक येथे सभा सुरू असताना, एका युट्यूब चॅनलवर देखील धनराज विश्वकर्मा या व्यक्तीने चाकणकर यांच्यविषयी अश्लील भाषा वापरली होती. याची दखल घेत सिंहगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -
- Rupali Chakankar Criticized Supriya Sule : राष्ट्रवादी पक्षाच्या वागणुकीमुळे माझी भूमिका बदलली - रुपाली चाकणकर
- Rupali Chakankar: 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी रुपाली चाकणकर तयार; म्हणाल्या...
- Rupali Chakankar Demand: हरवलेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी 'महा महिला आयोगा'ची समिती स्थापन करण्याची मागणी