पुणे - कोरोना वॉर्डात सलग सात दिवस काम केल्यानंतर अलगीकरणासाठी सात दिवसाची सुट्टी देण्यात यावी, या मागणीसाठी ससून रुग्णालयातील परिचारिकांनी आज (20 ऑगस्ट) रुग्णालयाचे डीन मुरलीधर तांबे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.
सध्या ससून रुग्णालयात कोविड वार्डात सात दिवस काम केल्यानंतर परिचारिकांना अलगीकरणासाठी तीन दिवस सुट्टी दिली जाते. पण, ही सुट्टी पुरेशी नसून अलगीकरणासाठी सात दिवसांची सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी या परिचारिकांना केली आहे.शिवाय कोरोना वॉर्डात सलग सात दिवस काम केल्यानंतरही या परिचारिकांचे घशातील स्राव (स्वॅब) घेतले जात नाहीत. जर या परिचारिकांनी काम करुन घरी गेल्या तर त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोनाची बाधा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सातदिवसांच्या कामानंतर परिचारिकांचे स्वॅब घेतले जावे, अशी मागणीही यावेळी परिचारिकांनी केली आहे.
या आंदोलनानंतर ससून रुग्णालयाचे डीन डॉ. मुरलीधर तांबे यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
हेही वाचा - मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी 'ती' कर्तव्यावर तत्पर