पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी येत्या 3 मे ला परिक्षा होणार आहे. मात्र, या परिक्षेत भटक्या जमाती (एनटी) प्रवर्गातील उमेदवारांना डावलण्यात आले आहे, अशी तक्रार स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या या उमेदवारांनी दिली आहे.
राज्यातील पीएसआय पदासाठीची जाहिरात शुक्रवारी प्रकाशित झाली. या जाहिरातीनुसार, 650 पदांची भरती करण्यात येणार आहे. यात भ.ज (क) या वर्गासाठी 24 तर भ.ज (ड) या वर्गासाठी 13 जागा आरक्षित असणे अपेक्षित आहे. मात्र, यात भ.ज (क) या वर्गासाठी केवळ 2 जागा देण्यात आल्या आहेत. तर भ.ज (क) या वर्गासाठी एकाही जागा आरक्षित नाही. राज्यातील धनगर आणि वंजारी जमातीतील उमेदवारांशी निगडीत हा प्रश्न आहे. हा भ.ज (क) प्रवर्गात धनगर समाज तर भ.ज (ड) मध्ये वंजारी समाज मोडतो.
हेही वाचा - हृदयद्रावक : मुलाची 'ती' आर्त हाक वडिलांनी ऐकलीच नाही
वर्षानुवर्षे या दोन्ही प्रवर्गाच्या जागा एमपीएससी बिंदुनामावली आरक्षणात सरप्लस दाखवत आली आहे. त्यातूनच ही समस्या निर्माण झाली. मात्र, त्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे नुकसान होत आहे. हे उमेदवार आरक्षणाच्या लाभा पासून वंचित राहणार असल्यामुळे त्याविरोधात उमेदवारांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.