पुणे - जम्बो रुग्णालयात जाऊन कोणत्याही राजकीय पक्षाने हस्तक्षेप करू नये. डॉक्टरांना त्यांचे काम करू द्यावे. त्यांचे मनोबल आपण वाढवले पाहिजे. जर कोणत्याही राजकीय राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांने तिथे जाऊन हस्तक्षेप केले, तर ते चालणार नाही, असे स्पष्ट मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले आहे.
जम्बोतील डॉक्टरांनी दिला होता 'काम बंद'चा इशारा -
जम्बो रुग्णालयातील डॉक्टरांना धमकवण्याचा प्रकार घडला आहे. यामुळे त्रासलेल्या डॉक्टराला महापौरांसमोरच अक्षरशः रडू कोसळले. अशा परिस्थितीत काम कसे करायचे, असा प्रश्न जम्बोतील रुग्णातील डॉक्टरांनी केले आहे. जर यानंतर अशा पद्धतीने कोणत्याही पक्षाच्यावतीने हस्तक्षेप झाले, तर काम बंद करू, असा इशाराही या डॉक्टरांनी दिला आहे.
भाजपच्या कोणत्याही नागरसेवकाचा हस्तक्षेप नाही -
जम्बो रुग्णालयात भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नगरसेवकाने हस्तक्षेप केलेला नाही. भारतीय जनता पक्षाच्या संस्कृतीत अशा पध्दतीने हस्तक्षेप करणे शिकवले गेलेले नाही. कोणत्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने हे जे काही करण्यात आले आहे, त्याच आम्ही निषेध करतो, असे मत यावेळी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - कोल्हापुर- चंद्रकांत पाटलांचे कोल्हापूरातील कर्तृत्व काय? राजेश क्षीरसागरांचा टोला