राजगुरूनगर (पुणे) - संत ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी वारी पालखी सोहळा होत असताना मंदिर परिसर कंटेन्मेंट झोन केल्याने या परिसरात वारकरी व भाविकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आजचा हा आषाढी वारी सोहळा केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
आज पहाटेच्या सुमारास माऊलींच्या संजीवन समाधीवर अभिषेक केल्यानंतर दूध आरती व काकड आरती करण्यात आली. त्यानंतर या सोहळ्याला सुरुवात झाली. आज दुपारी माऊलींना नैवेद्य दाखवला जाईल. त्यानंतर दुपारी चार वाजता प्रस्थानाच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात होईल. मोजक्याच व्यक्तींच्या हस्ते माऊलींच्या संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पोशाख करण्यात येणार आहे. त्यानंतर माऊलींची व गुरुवर्य हेपतबाबांची आरती करण्यात येईल. ज्ञानेश्वरांची पहिली वारी हेपतबाबांनी सुरू केली. त्यामुळे त्यांना मानाचे स्थान आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा, मंदिर प्रवेश भाविकांसाठी बंद - संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा
संजीवनी समाधी मंदिर परिसर कंटेन्मेंट झोन करण्यात आला असून माऊलींचे संपूर्ण मंदिर, भक्तनिवास तसेच सर्व परिसर स्वच्छ करून निर्जंतुक करण्यात आला आहे. तर नगरपालिकेच्या वतीने शहरात औषध फवारणी करण्यात आले असून मंदिरालगतची सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.