पुणे : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी काल फेसबुकवर पोस्ट करत त्यांना पक्षात मिळत असलेल्या वागणुकीबाबत उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज नितीन गडकरी यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांची समजूत काढली आहे. यावेळी मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, नितीन गडकरी हे माझ्या घरी येऊन गेले याचा मला आनंद आहे. त्यांनी मला आशीर्वाद दिला, वरिष्ठ मला वेळ देणार आहेत. त्या वेळेला मी वरिष्ठांशी बोलणार आहे. यापेक्षा जास्त आज मी काही बोलणार नाही, असे यावेळी कुलकर्णी म्हणाल्या.
मेधा कुलकर्णी यांच्या निवासस्थानी दिली भेट : कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी फेसबुकवर पोस्ट करत सध्याचे नेते माझ्यासारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर ते आज चांदणी चौकातील कार्यक्रमाला येणार नसल्याचे सांगितले जात होते. पण ते मान्यवरांच्या बरोबर उपस्थित होते. या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर गडकरी यांनी कुलकर्णी यांच्या निवासस्थानी भेट दिली.
काय आहे प्रकरण : कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Former BJP MLA Medha Kulkarni) यांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा जाहीर निषेध केला आहे. मेधा कुलकर्णी यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित सध्याचे नेते माझ्यासारख्यांचे अस्तित्व पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होती की, "मला पक्षाने डावलल्याबाबत मी कधीच जाहीर वाच्यता केलेली नाही. मला विश्वासात न घेता अचानक निर्णय घेण्यात आल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला होता. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पाहिली त्याबाबत अतिशय दु:ख झाल्याची खंतदेखील कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा -
Medha Kulkarni Post : भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; माजी आमदार मेधा कुलकर्णी नाराज