पुणे : 90 टक्के शिवसेनिकांचा बाळासाहेबांच्या विचाराकडे ओढा आहे. परंतू यांना थांबवण्यासाठी मध्यवर्ती निवडणूक होणार, सरकार पडणार, असे म्हणून थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे म्हणत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला ( Deepak Kesarkar pune tour ) आहे.
दीपक केसरकर दौऱ्यावर : शिक्षण मंत्री दीपक केसरकर पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीमध्ये शरद पवार हे ऋषीतुल्य व्यक्तिमत्व आहे. इतर वेळी सुद्धा मुख्यमंत्री त्यांना भेटतात. त्यांचा सल्ला घेतात, त्यामुळे त्या भेटीचा अर्थ वेगळा करण्याची गरज (CM Eknath Shinde and Sharad Pawar Meeting ) नाही. महाराष्ट्रासह सर्वांनाच शरद पवार यांच्या प्रकृती बद्दल चिंता असते. त्यामुळेच मुख्यमंत्री भेटायला गेले असे मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या भेटीवर मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे .
ग्लोबलस नीतीचा वापर : त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ग्लोबल नीतीचा वापर करत ( Uddhav Thackeray Aditya Thackeray global policy )आहेत. एकच गोष्ट सातत्याने खोटं बोलल्यानंतर ते खरी वाटायला लागते. त्यामुळे या सर्व बोलण्याला आम्ही सविस्तर पत्रकार परिषद घेऊन उत्तर देऊ . ते खोटे कसे आहे हे सुद्धा सांगू. हे कुठेतरी थांबवण्यासाठी आपण त्याला प्रत्युत्तर देणे गरजेचे आहे. असे म्हणत त्याने एक प्रकारे उद्धव ठाकरे यांना आम्हीही तुमच्या विरोधात बोलू शकतो असा इशारा दिला आहे.
सुषमा अंधारे-आदित्य ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारली : सुषमा अंधारे आणि आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली. काही ठिकाणी सेन्सिटिव्ह भाग ( Sushma Andhare Aditya Thackeray sabha denied ) असतात. त्या ठिकाणी प्रशासनाने तो निर्णय घेतला असेल. ते संबंध महाराष्ट्रावर फिरतात, वाटेल ते बोलतात, त्यांना कोण अडवणार, असेही यावेळी दीपक केसरकर यांनी सुषमा अंधारे आणि आदित्य ठाकरे यांच्या परवानगी वरून प्रतिक्रिया दिलेली आहे.
22 काँग्रेस आमदार : 22 काँग्रेस आमदार फडणवीस यांनी तयार ठेवले आहेत. असे चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्यावर सुद्धा दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली. काँग्रेस जर त्या आमदारांचा ऐकत नसेल.आणि त्यांचे जर एक तृतीयांश संख्या होत असेल तर त्यांना ते स्वातंत्र्य आहे की त्यांनी काय करावे असे दीपक केसरकर म्हणाले आहेत.