पुणे : पुण्यातील खडकवासला धरण्याच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या नऊ मुली बुडल्याची घटना आज सकाळी डोणजे, गोर्हे खुर्द तालुका हवेली गावच्या हद्दीत घडली आहे. ही घटना जेथे घडली तेथेदशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिक नागरिकांनी 9 पैकी 7 मुलींना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले आहे, मात्र दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या दोन्ही मुलींचे मृतदेह सापडले आहेत. दरम्यान घटनास्थळी हवेली पोलीस आणि पीएमआरडीएचे अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत.
बुलढाणातील होत्या मुली : प्राथमिक माहितीच्या आधारे, या सर्व मुली बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. त्या गोरे खुर्द गावात त्यांच्या नातेवाईकाकडे बारशाच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. या सर्व मुली खडकवासला धरणातील पाण्यात पोहण्यासाठी गेल्या होत्या. परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सर्व मुली पाण्यात बूडू लागल्या. धरणाच्या बाजूला दशक्रिया करण्यासाठी आलेल्या स्थानिकांना पोहायला उतरलेल्या मुली पाण्यात बूडू लागल्याचे त्यांना जाणवले, त्यानंतर त्यांनी मुलींना वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यातील 7 मुलींना वाचवण्यात यश आले आहे, पण दोन मुलींचा बूडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती होताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान ही घटना कलमाडी फार्म हाऊसजवळ घडली. घटनास्थळी हवेली पोलीस पीएमआरडीएचे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
परिसरात खळबळ : धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या 9 मुलींपैकी 2 मुलीचा मृत्यू झाला आहे. खुशी संजय खुर्दे (वय 14), शीतल भगवान टिटोरे (15), अशी मृत मुलींची नावे आहेत. शितल अशोक लहाने, (वय 16), पायल संजय लहाने (12), राशी सुरेश मांडवे (16), पल्लवी संजय लहाने (10), कुमूद संजय खुर्दे (7), मीना संजय लहाने (30), पायल संतोष सावढे (18), अशी इतर सात मुलींची नावे आहेत.दरम्यान, खडकवासला आणि पानशेत धरण परिसरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. सुरक्षेसाठी येथे मात्र कोणतीच सुविधा उभारण्यात आलेली नाही. पुणे शहरापासून खडकवासला धरण दूर आहे, जर काही दुर्घटना घडली तर बचाव दलाला पोहचण्यास उशीर होत असतो. त्यामुळे अनेक घटनांमध्ये मृत्यू झाले आहेत, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. दरम्यान पर्यटकांनीही सावधगिरी बाळगावी. खोल पाण्यात उतरु नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
हेही वाचा -