ETV Bharat / state

Sambhaji Maharaj Jayanti : पुढील वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती शासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार - पालकमंत्री चंद्रकांत पाटील - छत्रपती संभाजी महाराज जयंती

पुढील वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती शासनाच्या वतीने मोठ्या दिमाखात साजरी करण्यात येईल असे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. राज्य शासनाच्यावतीने किल्ले पुरंदर येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात येणार आहे.

Sambhaji Maharaj Jayanti
Sambhaji Maharaj Jayanti
author img

By

Published : May 14, 2023, 6:17 PM IST

छत्रपती संभाजी महाराज जयंती सारजरी करतांना चंद्रकांत पाटील

पुणे : पुढील वर्षी राज्य शासनाच्यावतीने किल्ले पुरंदर येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येईल अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी शंभुसृष्टी उभारण्यासाठी देखील सहकार्य करण्यात येईल असे त्यांनी त्यांनी यावेळी सांगितले. आज छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने किल्ले पुरंदर येथे शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी हि माहिती दिली. या कार्यक्रमाला आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

संभाजी महाराजांचे बलिदान देशाची प्रेरणा : परकीय आक्रमाणाच्यावेळी अनेक लढाया जिंकून जनतेच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासोबतच स्वराज्यासाठी प्रसंगी मृत्यूलाही कसे सामोरे जावे याचा आदर्श संभाजी महाराजांनी आपल्यासमोर ठेवला आहे. त्यांचे बलिदान आजही देशप्रेमाची प्रेरणा देणारे आहे. छत्रपती संभाजी महाराज युद्धात तरबेज होते. तसेच ते न्यायनिवाडा करण्यात निष्णात होते असे चंद्रकांत पाटील यांनी बोलतांना सांगितले. आदर्श प्रशासन कसे असावे याचा आदर्श संभाजी महाराजांनी एक आदर्श समोर ठेवला आहे. अशा महापुरुषांची जयंती साजरी करतांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू जाणून घेणे आवश्यक आहे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

संभाजी महाराजांचा त्याग समाजापुढे येणे महत्वाचे : या भूमीत, या मातीत छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला आहे. आम्ही लहान पणापासूनच याठिकाणी छत्रपती यांना वंदन करण्यासाठी येत असतो. कोण काय करत आहे, कोण श्रेय घेत आहे यापेक्षा आज छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मदिवस साजरा करूया. जे कोणी श्रेय वाद करत असतील त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर देऊ. श्रेय वादापेक्षा छत्रपती संभाजी महाराज यांनी दिलेलं योगदान, त्यांनी दिलेलं त्याग हा समजापुढे येणे महत्त्वाचं आहे, असे आमदार संजय जगताप यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -

Sanjay Shirsat On Cabinet Expansion : ​​केंद्रात शिवसेनेला दोन मंत्री पदे मिळतील; संजय शिरसाट यांचा दावा

Nitesh Rane criticize Sanjay Raut : '..म्हणून संजय राऊतांनी महाविकास आघाडी सरकार पाडले', नितेश राणेंचा गंभीर आरोप

CISCE Result 2023 : ICSE परीक्षेत पुन्हा मुलींनी मारली बाजी, असा चेक करा निकाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.