पुणे - राज्यात मान्सूनने पुन्हा आगमण केल्याचे चित्र गेल्या सोमवारी पहायला मिळाले आहे. कोकण गोवा, मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ याठिकाणी गेल्या चोवीस तासात अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला. तर, काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. पुढील ४८ ते ७२ तास राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
राज्यात कुठे-कुठे पडणार पाऊस -
राज्यात येत्या 48 तासात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कोकण गोवा परिसरात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजाचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यात देखील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भाचा विचार केला. तर, विदर्भात देखील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 30 जून आणि 2 जुलै दरम्यान कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाडा आणि विदर्भात देखील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
राज्यात गेल्या चोवीस तासात कुठे किती झाली पाऊस -
दरम्यान गेल्या चोवीस तासांत राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. कोकण आणि गोवा या भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. तर तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पाऊस झाला आहे.
गेल्या चोवीस तासांत राज्यात नोंदवल्या गेलेल्या पावसाचा विचार केला तर, कोकण आणि गोवा या परिसरातल्या तलासरी येथे 12 सेंटीमीटर पाऊस झाला आहे. पालघर, ठाणे येथे 6 सेंटीमीटर पाऊस झाल आहे. कल्याण येथे 5 सेंटीमीटर तर डहाणू ,कर्जत, विक्रमगड येथे 4 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
मध्य महाराष्ट्रात गिरणा धरण परिसरात 11 सेंटीमीटर कोपरगाव, मालेगाव, संगमनेर, शेवगाव परिसरामध्ये 5 सेंटीमीटर चोपडा, श्रीरामपूर 4 सेंटीमीटर चाळीसगाव, धरणगाव नांदगाव, पाचोरा, रहाता परिसरामध्ये 3 सेंटीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.
मराठवाड्यामध्ये अंबड येथे 9 सेंटीमीटर, जालना 7 सेंटीमीटर, बिलोली 6 सेंटीमीटर, अर्धापूर, भूम, पाथरी 5 सेंटीमीटर, गंगाखेड, घनसावंगी, हिमायतनगर, खुलताबाद, मंठा, मानवत, सोनपेठ येथे 4 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
विदर्भातल्या मूल येथे 6 सेंटीमीटर ब्रह्मपुरी, दौंड, पिंपरी, सोली, सिंदखेडराजा, सिरोंचा या ठिकाणी 4 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे.