पुणे - जुन्नर तालुक्याच्या नगदवाडीमध्ये एक आगळवेगळा लग्न सोहळा पार पाडला. नवरदेवाने नवरीसह बुलेट गाडीवर स्वार होत लग्न मंडपात प्रवेश केला. धोत्रे कुटुंबाचे चिरंजीव सागर आणि जाधव कुटुंबाची सुकन्या माधुरी यांचा नगदवाडी जुन्नर येथे अनोख्या पध्दतीने विवाह संपन्न झाला.
हेही वाचा - बदलत्या वातावरणातही ऊस उत्पादन वाढवायचे आहे? वाचा हा स्पेशल रिपोर्ट...
या लग्नात डिजेच्या तालावर नवऱ्या मुलाची मिरवणुक बैलगाडी सजवुन मराठमोळ्या पद्धतीने काढण्यात आली. तर पुढे घोड्यानेही गाण्याचा ताल धरला अन् नवरा मुलगा थेट घोड्यावर बसला, असा मिरवणुकीचा थाट. या लग्नाचे मुख्य आकर्षण राहिले ते नवरीमुलगी लग्न मंडपाबाहेर येताच त्यांच्या स्वागतासाठी पाहुणेमंडळी वाट पहात असताना या नवदाम्पत्याने थेट लग्न मंडपात बुलेटची स्वारी करत विवाहमंच गाठला. त्यामुळे या विवाहाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
हेही वाचा - राघोबादादा जरा आनंदीबाईला आवरा.. महिला शिवसैनिकांनी अमृता फडणवीसांच्या फोटोला मारले जोडे
लग्न समारंभात हौसमौस व्हावी, यासाठी दोन्ही कुटुंब आगळेवेगळे प्रयोग करत असतात. मात्र, सागर आणि माधुरीच्या लग्नातील मराठमोळा साज, मिरवणुक आणि बुलेट स्वारी पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरली आहे.